लग्ना आधीचं ही निर्माती झाली एका मुलाची आई; एका छोट्या कारणामुळे आजही अविवाहित

बॉलिवूडमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी लग्न केलं नाही. पण त्यांनी मुलांचं मातृत्व स्वीकारलं आहे.

Updated: Jun 7, 2021, 10:52 AM IST
लग्ना आधीचं ही निर्माती झाली एका मुलाची आई;  एका छोट्या कारणामुळे आजही अविवाहित title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी लग्न केलं नाही. पण त्यांनी मुलांचं मातृत्व स्वीकारलं आहे. अशा महिलांपैकी एक महिला म्हणजे निर्माती  आणि दिग्दर्शक एकता कपूर. एकता कपूरचा जन्म 7 जून 1975 साली मुंबईत झाला. टीव्ही विश्वात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी एकता अभिनेते जितेंद्र कपूर आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. वयाच्या 15व्या वर्षी एकताने तिच्या करियरची सुरूवात केली. आज  एकता 46 वर्षांची झाली आहे. एकताला कायम तिच्या रिलेशनशीपबद्दल विचारलं जातं. 

एका मुलाखतीत एकताला तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. लग्नाचे साईड ईफेक्ट असा प्रश्न एकताला विचारला यावर ती म्हणली, 'लग्नानंतर स्वतःला धैर्यवान व्हाव लागतं आणि माझ्यात धैर्य फार कमी आहेत. म्हणून मी लग्न केलं नाही. जण तुम्हाला आयुष्यात लग्न हवं असेल तर धैर्य आणि कायम देखावा करावा लागतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे एकताला विचारलं लग्नाचा प्रश्न विचारल्यानंतर एकता चिडेत? यावर एकता म्हणाली, 'हो बरोबर आहे. मला त्या लोकांना विचारायचं आहे, तुम्ही माझे आई-वडील आहात का? आपल्या देशात सर्वात जास्त प्राधन्य लग्नाला का दिलं जातं? ही एक मोठी अडचण आहे.' एकता कपूरला एक मुलगा आहे. त्याचं नाव रवी असं आहे. 

एकताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कहीं किसी रोज’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कहीं तो होगा’, ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘ये है मोहब्बतें’, ‘जोधा अकबर’, ’नागिन’, ‘कुमकुम भाग्य’ और ‘कुंडली भाग्य’ यांसारख्या अनेक मालिकांची निर्मिती केली. 

त्यानंतर एकताने 2001 साली बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. एकताने 'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’, ‘कुछ तो है’ आणि ‘कृष्णा कॉटेज’ चित्रपटांची निर्मिती केली. शिवाय एकता आता ऑल्ट बालाजीवर एक वेब शो देखील बनवत आहे.