ही पोस्ट देतेय प्रियंका चोप्राच्या नव्या प्रोजेक्टचे संकेत

प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची तिच्या सगळ्या अपडेटकडे नजर असते. कारण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 05:54 PM IST
ही पोस्ट देतेय प्रियंका चोप्राच्या नव्या प्रोजेक्टचे संकेत title=

मुंबई : प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची तिच्या सगळ्या अपडेटकडे नजर असते. कारण 

अगदी बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये देसी गर्लचे चाहते आहेत. आणि असं असताना फॅन्सची करडी नजर तिच्याकडे असते. सध्या प्रियंका चोप्रा क्वांटिको ३ च्या शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये बिझी आहे. पण असं असलं तरीही ती आपल्या चाहत्यांसाठी वेळ काढतेच काढते. 

कितीही बिझी असली तरी प्रियांका सोशल मीडियावर स्वत:चे डे टू डे लाईफचे फोटो शेअर करत असते. आणि आपल्या चाहत्यांना डे टू डे लाईफचे अपडेट देत असते. इन्स्टाग्रामवर प्रियंका चोप्राने एक ताजा फोटो पोस्ट केला आहे. पण तिचा हा फोटो पाहून अनेकांची उत्सुकता वाढली आहे. होय, म्हणजे खुद्द प्रियांकानेच ती वाढवली आहे. 

 

Mood. Stepping out of the box. #nyclife

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

या फोटोला दिलेले कॅप्शन पाहून सगळेच संभ्रमात पडले आहेत. ‘Mood. Stepping out of the box #NYCLife’ , असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. आता हे कॅप्शन प्रियांकाच्या भविष्यातील नव्या योजनेचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण प्रियंका ही अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील आपलं काम दाखवलं आहे. तसेच तिने मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून व्हेंटिलेटर हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. आता तिचं नवं काय याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. 

प्रियांकाची सध्या ज्याप्रमाणे घोडदौड सुरु आहे, त्यावरून तरी प्रियांकासाठी काहीही कठीण नाही, ही खात्री सगळ्यांनाच पटली आहे. आता नवा प्रोजेक्ट प्रियंकाचा नवा सिनेमा आहे की काय? आणि सिनेमा असेल तर तो बॉलिवूडमध्ये ही हॉलिवूडमध्ये अशी चर्चा रंगली आहे.