'देसी' प्रियंकाचा मॉर्डन लूक; जाळीदार ड्रेसमधील अजब फॅशन

छोट्या बॅगमुळे Oops मुव्हमेंटची शिकार होताना वाचली...

Updated: Oct 9, 2021, 07:50 AM IST
'देसी' प्रियंकाचा मॉर्डन लूक; जाळीदार ड्रेसमधील अजब फॅशन  title=

मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत अभिनयच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. प्रियंका सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी मात्र तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर  केलेली पोस्ट काही क्षणांत व्हायरल होते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिने जाळीदार ड्रेस घातला आहे. प्रियंकाने कोणत्याही प्रकारचा घतला तर ती तो लूक कॅरी करू शकते. पण आता घातलेल्या या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रियंकाने काळ्या रंगाचा स्लीवलेस टॉप आणि sheer स्कर्ट घातला होता. स्कर्टवर  हिरव्या रंगाच्या फुलांचा पॅटर्न होता. 

छोट्या बॅगवर सर्वांच्या नजरा
प्रियांका चोप्रा जे काही घालते, ती ते पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी करते, पण जाळीदार ड्रेसमुळे प्रियंका अडचणीत सापडली. पण यावेळी तिच्या छोट्या बॅगने तिला oops मुव्हमेंटचा शिकार होण्यापासून वाचवलं. प्रियंकाने घातलेल्या जाळीदार ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. Kukhareva या अधिकृत वेबसाइटनुसार, या ड्रेसची किंमत 625 पौंड म्हणजेच सुमारे 58 हजार रुपये आहे.