मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे.
सध्या प्रियांका चोप्रा सिरीयातल्या मुलांना भेटते आहे. युनिसेफच्या माध्यमातून ती या मुलांना भेटली. तीन चार वर्षाच्या मुलांपासून अगदी १२ ते १५ वर्षाच्या मुलामुलींचा यात समावेश आहे. या मुलांमध्ये कोण काय करतं, कोणाची कशात गती आहे हे सगळं तिने ट्विटरवर शेअर केलं आहे.
Ive worked w/ @UNICEFIndia for 12 yrs&visited many such places. What have u done @RavindraGautam_ ?Y is 1 childs prob less imp than another? https://t.co/GaxeKyXDrK
— PRIYANKA (@priyankachopra) September 10, 2017
त्या ठिकाणी जाण्यापेक्षा भारतातल्या ग्रामीण भागात जा, तिथे तुला अनेक मुलं भेटतील जी अन्नावाचून उपाशी आहेत अशी सूचना करण्यात आली आहे. पण प्रियंकाने या ट्रोलिंगला सडेतोड उत्तरही दिले आहे.
युनिसेफने घडवून आणलेल्या या भेटीत प्रियंका अनेक मुलांना भेटली. त्याचे फोटो तिच्या अकाउंटवर दिसतात. मात्र त्याचं कौतुक करण्याऐवजी अनेकांनी प्रियंकाची कानउघडणी केली आहे. यावर तिनेही थेट उत्तर दिलं आहे.
Cultures are so lovely.so different yet so similar. Kalam is arabic for pen and it's kalam in Urdu/Hindi too. https://t.co/mUGD2qbCWV pic.twitter.com/O2283Eo1n3
— PRIYANKA (@priyankachopra) September 10, 2017
गेल्या 10 वर्षांपासून मी युनिसेफचं काम करते आहे. या दरम्यान मी अनेक मुलांना भेटले आहे. आणि मुलांच्या अडचणी या अडचणीच असतात, एकाची दुसऱ्यापेक्षा कमी असं होत नाही, असे खडेबोल ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहेत.