Priyanka Chopra second annual South Asian Excellence pre-Oscars bash : सध्या सगळीकडे ऑस्करचीच चर्चा सुरु आहे. यंदाच्या वेळचे ऑस्कर (Oscar) भारतीयांसाठी खूप महत्त्वाचे आहे. यंदा एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी नॉमिनेशन देण्यात आले आहे. यासाठी अभिनेता राम चरणपासून ज्युनियर एनटीआरपर्यंत सेलिब्रिटी अमेरिकेत पोहोचले आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) एका ग्रॅँड पार्टीचे आयोजन केले होते. त्यावर अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) ते जॅकलिन फर्नांडिसपर्यंत (Jacqueline Fernandez) मलाला युसूफजईसोबत (Malala Yousafzai) अनेकांनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या पार्टीचे अनेक फोटो अभिनेत्री प्रिती झिंटानं शेअर केले आहेत. यावेळी प्रितीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये Never Have I Ever या लोकप्रिय सीरिजमधील कलाकारांपासून अनेक हॉलिवूड कलाकार पाहायला मिळाले. इतकंच काय तर ज्युनियर एनटीआर देखील आहे. दरम्यान, या सोबत प्रियांकानं अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला तिच्या घरी देखील बोलावले होते. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या घरातील हे फोटो राम चरणची पत्नी उपासनानं शेअर केले आहेत. या फोटोत आपण पाहू शकतो की राम चरण (Ram Charan) आणि त्याची पत्नी उपासना (Upasana) हे प्रियांका चोप्राच्या एलएअत असलेल्या घरी आहेत. यावेळी प्रियांकानं राम चरणची तिच्या आणि त्यासोबतच पती निक जोनसच्या आई-वडिलांशी ओळख करून दिली आहे.
हेही वाचा : 'एकीकडे आईचं निधन तर दुसरीकडे पती...', Rakhi Sawant च्या त्या गाण्यावरून एकच चर्चा
दरम्यान, पार्टीसाठी शूट केलेल्या एका फोटोशूटमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी प्रियांका आणि राम चरणच्या 10 वर्षे जुन्या फोटोशी तुलना करण्यात आली आहे. हा फोटो शेअर करत त्यांच्या फॅन क्लबनं 10 Yf Challenge असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया मिळत आहे.
दरम्यान, 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जंजीर' या चित्रपटात प्रियांका आणि राम चरणनं एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्पूवा लाखिया यांनी केलं होतं. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली नाही मात्र, प्रियांका आणि राम चरणची चांगलीच मैत्री झाली. या चित्रपटात राम चरणनं पोलिसाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातून राम चरणनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यानं कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात काम केलं नाही. आज राम चरण हा दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार आहे. आरआरआर च्या यशानंतर राम चरणला आज लाखो लोक ओळखतात.