मुंबई : प्रियंका चोप्रा 'द स्काय इद पिंक' या सिनेमातून खूप दिवसांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमात प्रियंका अभिनेता फरहान खान आणि जायरा वसीमसोबत दिसत आहे. सध्या या सिनेमाचं अतिशय जोरात प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन दरम्यान प्रियंकाने निक आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरंच काही सांगितलं.
प्रमोशनदरम्यान प्रियंकाने आई होण्याबद्दल देखील मोठा खुलासा केला. 'द स्काय इज पिंक' या सिनेमाचं फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील जोरदार प्रमोशन होत आहे. प्रियंकाला या वेळी 'आई' होण्यावरून अनेक प्रश्न विचारण्यात आले.
प्रियंका 'आई' होण्याबाबत विचारल्यावर तिने अगदी उत्साहाने उत्तर दिलं. मी आई होण्याची वाट पाहू शकत नाही. मी यासाठी आतुर आहे. मी आशा करते की, सगळ्यांच्या आयुष्यात हा खास आनंदी क्षण यावा. निक आणि मी देखील या सुंदर क्षणांची वाट पाहत आहोत. प्रियंकाच्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रियंका आणि निकने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानच्या जोधपुरमधील उम्मैद भवनात लग्न केलं. दोघांच्या शाही लग्नाची जोरदार चर्चा रंगली. हे लग्न अगदी खासगी सोहळ्याप्रमाणे पार पडलं. मीडियाला देखील या लग्नाला येण्यास मज्जाव होता. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
'द स्काय इज पिंक' या सिनेमातून प्रियंका चोप्रा जवळपास 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 2016 मध्ये 'जय गंगाजल' या सिनेमात या अगोदर काम केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केलं होतं. आताच्या सिनेमाचं दिग्दर्शन शोनाली बोस करत असून प्रियंका यामध्ये जायरा वसीमच्या आईची भूमिका साकारत आहे.