मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. तिचा मॅट्रिक्स हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेत आहे.
अभिनेत्री एकापेक्षा एक वेश परिधान करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. पण कधी कधी प्रियांका खूप प्रयोगशील बनते. एकदा प्रियंका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्रा न घालता पोहोचली होती.
अनकंफर्टेबल दिसली प्रियंका
बाफ्ता अवॉर्ड एप्रिल २०२१ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने आतापर्यंतचा सर्वात बोल्ड ड्रेस परिधान केला होता. त्या फंक्शनमध्ये प्रियांकाला कुणी पाहिलं तर ते पाहतच राहिले. या अभिनेत्रीचा तिच्या ड्रेसिंगचा प्रयोग चांगलाच जड गेला. या लूकमध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती. तिला तिचं जॅकेट पुन्हा पुन्हा सांभाळावं लागलं.
यावेळी प्रियांका चोप्राने पांढर्या रंगाची धोती पँट आणि गुलाबी रंगाच्या एम्ब्रॉयडरी जॅकेटसह काळ्या फुटवेअरमध्ये तयार झाल्याचं दिसली होती. त्याचबरोबर, या एम्ब्रॉयडरी जॅकेटचा पुढचा भाग वरच्या काही बटणांनंतर पूर्णपणे उघडला होता. जी खूपच धोकादायक फॅशन होती. पण या लूकमध्येही प्रियांका अप्रतिम दिसत होती आणि तिने ही हाय-फाय फॅशन पूर्ण आत्मविश्वासाने कॅरी केली. प्रियांकाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच ती टोलर्सच्या निशाण्यावर आली ही वेगळी बाब असली तरी, लोकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.