एक पती म्हणून प्रियांकाचा पती स्वत:ला का ठरवतोय अपयशी?

चर्चांना उधाण येणं स्वाभाविकच आहे.   

Updated: Dec 13, 2021, 04:19 PM IST
एक पती म्हणून प्रियांकाचा पती स्वत:ला का ठरवतोय अपयशी? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नावातून जोनास हे पतीचं आडनाव कमी केल्यापासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा जी चर्चेत आली आहे, की आजही चर्चेतच आहे. तिच्याशीसंबंधित प्रत्येक लहानसहान गोष्टी चाहत्यांच्या नजरा वळवत आहेत. त्यातच निक जोनाससोबतच्या तिच्या नात्याभोवती असणारं एक वलय पाहता त्यासंबंधीच्या चर्चांना उधाण येणं स्वाभाविकच आहे. 

चर्चा इतक्या वाढल्या की प्रियांका आणि निकच्या घटस्फोटापर्यंत गोष्ट पोहोचली. 

कालांतरानेही जोडी घटस्फोट घेत नसल्याचं स्पष्ट झालं. पण, आता म्हणे निकला तरीही कसलीशी भीती सतावत आहे. खुदद् निकनंच याबाबत वक्तव्यही केलं आहे. 

निक सध्या जोनास ब्रदर्सच्या मिनी सीरिजमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला. आता म्हणे निकनं एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 

व्हिडीओमध्ये तो प्रियांका, तिच्यासोबतचं नातं याबाबत चर्चा करताना दिसत आहे. शिवाय आपल्या मनात असणाऱ्या भीतीचाही तो इथं उल्लेख करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jerry x Mimi  (@jerryxmimi)

'मला भीती आहे, की मी एक चांगला पती, मुलगा आणि भाऊ नाही आहे. असं असलं तरीही माझं कुटुंबच सर्वस्व आहे. त्यामुळं त्यांना मी कशी वागणूक देतो हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे', असं निक म्हणाला. 

निकच्या मनात आता ही भीती नेमकी का आहे आणि आता प्रियांकाच तिच्या पतीची भीती कशी घालवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.