प्रियांका-निकला आपल्या बाळाची घ्यावी लागणार अति काळजी, कारण...

प्रियांका चोप्रा आई बनल्यानंतर चाहत्यांसोबतच तिचा मित्र परिवार देखीलही खूप खूश आहेत पण...

Updated: Jan 22, 2022, 08:07 PM IST
प्रियांका-निकला आपल्या बाळाची घ्यावी लागणार अति काळजी, कारण... title=

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास पालक बनल्यानंतर चाहत्यांसोबत त्यांचे मित्र परिवार देखीलही खूप खूश आहेत. 'देसी गर्ल'ने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, बॉलिवूड आणि हॉलिवूडचे सेलिब्रिटी तिचं सतत अभिनंदन करत आहेत. 

प्रियांकाने पोस्ट करून खुलासा केला नाही की, तिला मुलगी झाली आहे की मुलगा, परंतु अशा बातम्या आहेत की प्रियंका पहिल्यांदाच एका मुलीची आई बनली आहे. लग्नाला 3 वर्षे  झाल्यानंतर हा आनंद त्यांच्या घरी आला आहे. प्रियांका आई झाल्यामुळे खूप आनंदी आहे.

प्री-मॅच्योर आहे बाळ!
एका वृत्तानुसार, प्रियांका एका छोट्या परीची आई बनली आहे. प्रियांका-निकची मुलगी प्री-मॅच्युअर आहे, कारण प्रसूतीच्या तारखेपासून 12 आठवड्यांआधीच तिने बाळाचा जन्म दिला आहे.

हेल्दी होई पर्यंत हॉस्पटलमध्ये रहाणार न्यूबॉर्न बेबी!
रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये सरोगसीच्या माध्यमातून हे घडलं आणि जोपर्यंत नवजात बाळ निरोगी होत नाही तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील. मूल पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच प्रियांका आणि निक त्याला घरी घेऊन जाऊ शकतील. मात्र, या वृत्तांवर प्रियांका किंवा निक जोनासची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.