प्रियांका चोप्राच्या मॉर्डन मंगळसूत्रात दडलीये 'ही' खास गोष्ट !

प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर USA मध्ये स्थायिक झाली आहे.

Updated: Sep 3, 2021, 09:39 AM IST
 प्रियांका चोप्राच्या मॉर्डन मंगळसूत्रात दडलीये 'ही' खास गोष्ट ! title=

मुंबई : प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर USA मध्ये स्थायिक झाली आहे, पण तिचे हृदय नेहमीच भारतात असेल हे उघड करण्यास तिला वेळ लागत नाही. भारतीय सण साजरे करायला अभिनेत्री कधीच विसरत नाही आणि बऱ्याच फक्शनला ती देसी लूकमध्ये पाहायला मिळते. 
त्याचप्रमाणे, ती मंगळसूत्र परिधान करताना दिसते, जी भारतीय विवाहित स्त्रीच्या विवाहाचं प्रतिक असल्याचे म्हटले जातं. अनेक प्रसंगी, जरी तिने पाश्चिमात्य कपडे घातले असले तरीही. यावेळी, या अभिनेत्रीच्या गळ्यात एक नवीन मंगळसूत्र दिसले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. 

फोटोशूटमध्ये दिसले मंगळसूत्र

प्रियांका चोप्राने अलीकडेच एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केलं. फोटोंमध्ये तिचा ग्लॅमर अंदाज पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक स्टायलिश कपडे आणि ज्वेलरी घातली होती. यापैकी काही लूकसाठी, अभिनेत्रीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, पण निक जोनसने लग्नाच्या वेळी तिला घातलेल्या मंगळसूत्रापेक्षा हे मंगळसूत्र अगदी हटके आणि स्टाईलिश होतं.

गुलाबी रंगाच्या डिझाईनर जॅकेटवर प्रियांकाने गळ्याभोवती चोकर शैलीचे मंगळसूत्र घातले होते. यात 5 गोल आकाराचे पेंडंट होते, आणि मध्यभागी हिरा होता. सोन्याने बनवलेले हे मंगळसूत्र नव-पारंपारिक डिझाईन्सचे परिपूर्ण मिश्रण होते.

याबद्दल बोलताना प्रियंकाने शेअर केले की तिने यासाठी इटालियन लक्झरी लेबल Bvlgari सोबत हात मिळवला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये शेअर केले की तिने तीन वर्षांपूर्वी यासाठी नियोजन करायला सुरुवात केली होती आणि आता शेवटी तिचे स्वप्न साकार होताना दिसते. या मंगळसूत्राचं कौतुक करत प्रियांकाने म्हटलं आहे की, " हे मंगळ आधुनिक भारतीय महिलांसाठी योग्य आहे. ज्या त्यांच्या स्वत: च्या अटींवर आयुष्य जगतात."