अबब ! प्रियंकाकरता निकने विकतं घेतलं एवढं महागडं घर

पाहा हे घर 

अबब ! प्रियंकाकरता निकने विकतं घेतलं एवढं महागडं घर  title=

मुंबई : प्रियंका चोप्राने आपला बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला आहे. आता तिचे देशात आणि परदेशात असंख्य फॅन आहेत. देसी गर्ल प्रियंकाने आपला जीवनसाथी म्हणून निकची निवड केली आहे. प्रियंका निकसोबत भारतातच लग्न करत आहे. पण असलं असलं तरीही लग्नानंतरचं तिचं घर हे अमेरिकेत असणार आहे. 

इंटरनॅशनल मीडियानुसार, निकने प्रियंकासाठी अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये 6.5 मिलियन डॉलरचं एक घर खरेदी केलं आहे. याची भारतीय रुपयांत किमत आहे 47.50 करोड रुपये. 

माहितीनुसार, प्रियंका आणि निकचं घर हे 5 बेडरूमच असून त्यामध्ये 4 बाथरूम असा एक सुंदर बंगला आहे. 4,129 स्केवर फीट असलेल्या या घरात मोठं स्विमींग पूल देखील आहे. निकने प्रियंकाला प्रपोझ करण्याअगोदरच हे घर खरेदी केलं होतं. प्रियंका - निक ही जोडी देशात - परदेशातही खूप लोकप्रिय आहे. 

जेव्हापासून प्रियंका हॉलिवूडमध्ये गेली आहे तेव्हापासून ती न्यूयॉर्क आणि अमेरिकेतच आहे. प्रियंकाचं न्यूयॉर्कमध्ये स्वतःच घरं आहे. निक आणि प्रियंका 2 डिसेंबरला जोधपुरमध्ये लग्न करत आहेत.