PHOTO : प्रियांका - निकच्या साखरपुड्याचा पहिला फोटो

या कार्यक्रमात प्रियांका आणि निकचं कुटुंबही सहभागी झालंय.

Updated: Aug 18, 2018, 01:58 PM IST
PHOTO : प्रियांका - निकच्या साखरपुड्याचा पहिला फोटो  title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झालंय... किंबहुना प्रियांका आणि निकनं सोबत आपल्या नात्यात एक पाऊल पुढे टाकलंय. या दोघांचाही साखरपुडा आज मुंबईत पार पडतोय. या दोघांच्या 'रोका' विधीतील एक फोटोही आता समोर आलाय. 

शनिवारी सकाळी भारतीय परंपरेनुसार प्रियांका चोप्रा हिच्या घरी 'रोका'चा विधी पार पडला. या कार्यक्रमात प्रियांका आणि निकचं कुटुंबही सहभागी झालंय.  

आत्तापर्यंत या दोघांच्या अफेअरच्या आणि डेटिंगच्या चर्चा जोरावर होत्या पण आता मात्र हे जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतंय. त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे आज या जोडप्याचा साखरपुडा पार पडतोय. गुरुवारी रात्री उशिरा निक आपल्या आई-वडिलांसह भारतात दाखल झाला होता. प्रियांकानं त्यांच्या स्वागतासाठी खूप तयारीही करून ठेवलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक ऑक्टोबरमध्ये विवाह बंधनात अडकू शकतात.