प्रियंका-अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला...

अभिषेक बच्चन लवकरच अनुराग कश्यपच्या मनमर्जियां या सिनेमातून मोठ्या पदड्यावर कमबॅक करत आहे.

Updated: Apr 19, 2018, 06:27 PM IST
प्रियंका-अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला... title=

मुंबई : अभिषेक बच्चन लवकरच अनुराग कश्यपच्या मनमर्जियां या सिनेमातून मोठ्या पदड्यावर कमबॅक करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत विक्की कौशल आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचे शूटिंग अभिषेकने अलिकडेच पूर्ण केले. रिपोर्ट्सनुसार, अभिषेकला अजून एका सिनेमाची ऑफर मिळाली आहे.खरंतर सोनाली बोसने आपल्या आगामी सिनेमासाठी अभिषेकला विचारणा केली आहे. या सिनेमात त्याच्यासोबत देसी गर्ल प्रियंका चोप्रा असेल असे सांगण्यात आले आहे. या सिनेमाची कथा आयशा चौधरीच्या रियल लाईफवर आधारित आहे. सोनालीने मारग्रेटा विथ स्ट्रॉ या सिनेमातून डेब्यू केला होता.

प्रियंका-अभिषेक या खास भूमिकेत

सोनालीची अभिषेकच्या मनमर्जियांच्या सेटवर ओळख झाली. त्यानंतर त्याला सिनेमासाठी विचारण्यात आले. अभिषेकला स्क्रिप्ट आवडली आहे. सिनेमात प्रियंका आणि अभिषेक आयशाच्या पालकांच्या भूमिकेत दिसतील. तर आयशाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध अजून सुरु आहे.

प्रेक्षकांना भावली ही जोडी

प्रियंका आणि अभिषेकने दोस्ताना, ब्लफमास्टर यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. या सिनेमात या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.

Abhishek Bachchan, Priyanka Chopra

ही आहे सिनेमाची सत्य कथा

आयशा एक मोटिव्हेशनल स्पीकर होती. जिला १३ वर्षांची असताना प्लूमनरी फिब्रोसिस नावाचा आजार झाला. मात्र तिने हार मानली नाही आणि तिने आजाराशी शेवटपर्यंत झुंज दिली. या दरम्यान तिने 'My Little Epiphanies' नावाचे पुस्तक लिहिले. २४ जानेवरी २०१० मध्ये १८ वर्षांची असताना तिचे निधन झाले.

Abhishek Bachchan, Priyanka Chopra