हॉलिवूडच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका

फोर्ब्सच्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रालाही जागा दिली आहे. या यादीत सोफिया वरगारा ही पहिल्या क्रमांकावर आहे.

Updated: Sep 27, 2017, 09:02 PM IST
हॉलिवूडच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका title=

लॉस एंजेलिस : फोर्ब्सच्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रालाही जागा दिली आहे. या यादीत सोफिया वरगारा ही पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रियंकाने ‘क्वांटीको’ या मालिकेच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने ‘बेवॉच’ या सिनेमात व्हिलनची भूमिकाही साकारली होती. आता तिने हॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे. 

वार्षिक एक कोटी डॉलरच्या कमाईसोबत प्रियंका या यादीत आठव्या क्रमांकावर आली आहे. तर ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ची स्टार रॉबिन राईट ही ९० लख डॉलरच्या कमाईसोबत नवव्या स्थानावर आली आहे. वरगारा वर्षाला ४.१ कोटी डॉलरची कमाई करते. या यादीत ती गेल्या सहा वर्षांपासून अव्वल क्रमांकावर आहे. 

‘बिगबॅंग थ्योरी’ची स्टार केली कुओको २.६ कोटी डॉलरच्या कमाईसोबत या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्राने आता हॉलिवूडमध्ये चांगलंच बस्तान बसवलं आहे. तिचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.