एमी अवॉर्ड्समध्ये प्रियांकाचा जलवा...

अमेरिकेत लॉस अँजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ६९व्या एमी अवॉर्ड्स २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 18, 2017, 11:14 AM IST
एमी अवॉर्ड्समध्ये प्रियांकाचा जलवा...  title=

लॉस अँजेलिस : अमेरिकेत लॉस अँजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या ६९व्या एमी अवॉर्ड्स २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली. या सोहळ्यासाठी तिने खास डिजाईनर व्हाईट गाऊन घातला होता. या पुरस्कार सोहळा लॉस अँजेलिस येथील माइक्रोसॉफ्ट थिएटर मध्ये १७ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी प्रियांकाने एंथनी एंडरसनसोबत 'आउटस्टैंडिंग वेराइटी टॉक सीरीज' हा पुरस्कार 'लास्ट वीक टुनाइट विथ जॉन ओलीवर' च्या जॉन ओलीवरला प्रदान केला. 

पुरस्काराचे समारोप करताना रेड कार्पेटवर प्रियांकाने आपला जलवा दाखवला. या क्रिस्टलजडीत गाऊनमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत होती. यावेळेस प्रियांकाचे केस बांधलेले होते आणि लिपस्टिकची बेरी रेड शेड तिच्यावर अत्यंत आकर्षक दिसत होती. 

 

Loving the dark lipstick — #priyankachopra #emmys

A post shared by Priyanka Chopra Fan Page  (@pcourheartbeat) on

 

Stunner  #priyankachopra #emmys

A post shared by Priyanka Chopra Fan Page  (@pcourheartbeat) on

 

Lovely  at the #emmys .. the makeup is ! #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra Fan Page  (@pcourheartbeat) on

 

I LOVE ARTT — #priyankachopra #emmys

A post shared by Priyanka Chopra Fan Page  (@pcourheartbeat) on

 

PC spotted eating backstage  — #priyankachopra #emmys

A post shared by Priyanka Chopra Fan Page  (@pcourheartbeat) on

एमी अवॉर्ड्सला उपस्थित राहण्याचे प्रियांकाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षी प्रियांकाने लाल रंगाचा गाऊन घातला होता.