...म्हणून 'विंक गर्ल' प्रिया वारियर धर्मांधांच्या टार्गेटवर

प्रिया प्रकाश वारियर लवकरच 'श्रीदेवी बंगलो' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करतेय

Updated: Jan 28, 2019, 02:33 PM IST
...म्हणून 'विंक गर्ल' प्रिया वारियर धर्मांधांच्या टार्गेटवर title=

मुंबई : 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वारियर हिचा चेहरा आता प्रेक्षकांच्या ओळखीचा झालाय. आपल्या वेगळ्याच अंदाजात डोळे मिचकावणारी प्रिया एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली. हीच प्रिया आता पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आलीय... प्रियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोनंतर ही चर्चा सुरू झालीय. या फोटोमुळे अनेक जण प्रियाला ट्रोल करताना दिसत आहेत. या फोटोत प्रिया गेल्या वर्षी तिच्यासोबत दिसलेला अभिनेता रोशन अब्दुल राहूफ यांच्यासोबत दिसतेय. 

प्रिया ख्रिश्चन धर्मीय आहे तर रोशन मुस्लीम... ही गोष्ट काही धर्मांधांना बोचतेय. त्यांनी धार्मिक गोष्टींवरून टीप्पणी करत प्रियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. 

priya prakash warrier

दोन दिवसांपूर्वी प्रियानं हा फोटो शेअर केला होता. हा फोटो आत्तापर्यंत ६ लाख हून अधिक लोकांनी पाहिलाय. प्रियाच्या याच फोटोवर टीप्पणी करत एका युझरनं लिहिलंय, 'ख्रिश्चन मुलगी असून मुस्लीम मुलासोबत मैत्री करताना तुला लाज वाटायला हवी' तर आणखीन एका युझरनं 'दोन मृत व्यक्ती' म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. 

प्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'श्रीदेवी बंगलो' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करतेय. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असल्याच्या चर्चांमुळेही ती वादात अडकलीय. हा सिनेमा सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकलाय. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांनी केलंय. 

प्रिया 'उरु उदार लव' या मल्याळी सिनेमातील एका गाण्यातून सुपरहीट ठरली होती. हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता.