बापरे! इतकी आहे करिनाच्या या जॅकेटची किंमत

फॅशन आणि स्टाईलमध्ये बॉलिवूडची लाडकी बेबो, अर्थात करिना कपूर खानचा हात कोणीच धरु शकणार नाही.

Updated: Nov 9, 2017, 01:23 PM IST
बापरे! इतकी आहे करिनाच्या या जॅकेटची किंमत title=

मुंबई : फॅशन आणि स्टाईलमध्ये बॉलिवूडची लाडकी बेबो, अर्थात करिना कपूर खानचा हात कोणीच धरु शकणार नाही.

बॉलिवूडची ही बेबा अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. करिना नुकतीच 'बॅलेन्सियागा'चं डेनिम जॅकेट घालून एका पार्टीला आली होती. करिनाच्या या डेनिम जॅकेटची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. या जॅकेटची किंमत ऐकून अनेकांच्या भूवया देखील उंचावतील.

'बॅलेन्सियागा' ब्रँडच्या या डेनिम जॅकेटची किंमत आहे तब्बल 1295 डॉलर. म्हणजेच अंदाजे 84 हजार रुपयांच्या घरात. जॅकेटची 84 हजार रुपये किंमत ऐकून नेटिझन्सही चक्रावले आहेत.