President Draupadi Murmu Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाहता भारती प्रेक्षकांमध्ये असलेला उत्साह हा पाहण्यासारखा आहे. या सगळ्यात अशी माहिती समोर आली होती की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'गदर 2' पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे असे देखील म्हटले जात आहे. मात्र, भारत सरकारच्या फॅक्ट चेक यूनिटनं या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं आहे. या यूनिटनं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात चित्रपटाचं स्क्रीनिंग हा एक नियमित कार्यक्रम आहे. त्यात हे देखील म्हटले आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
पीआयबीकडून एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. त्यात असेही म्हटले आहे की राष्ट्रपती या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होणार नाहीत. दरम्यान, शुक्रवारी अनेक ठिकाणी अशा बातम्या होत्या की 'गदर 2' च्या निर्मात्यांकडून राष्ट्रपती भवनात चित्रपटाची एक स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात येणार आहे. ही सगळी माहिती रिपोर्ट्समध्ये देण्यात आली होती. त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता अनिल शर्मा यांच्या टीमनं असं सांगितल्याचं म्हटलं होते. त्यात असं म्हटलं होतं की सेंसर बोर्डाकडून अनिल शर्मा यांना फोन आला होता की राष्ट्रपती मुर्मू यांना चित्रपट पाहायचा आहे. राष्ट्रपतींची इच्छा पाहता त्यांनी होकार दिला आणि ही स्क्रिनिंग रविवारी होईल. मात्र, पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा चित्रपट पाहिला नाही हे सत्य समोर आलं आहे.
Media reports claim that Exclusive VIP Screening of Gadar 2 is being organised for the President#PIBFactCheck
It is a regular screening that happens in Rashtrapati Bhavan & President had not wished for any such special screening. #President is not attending the screening. pic.twitter.com/4HgLemTyek
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 13, 2023
दरम्यान, अनिल शर्मा यांनी आजतक डॉट इनला दिलेल्या मुलाखतीत याविषयी आनंद व्यक्त केला होता. ते म्हणाले हो की काल आम्ही बसलो होतो, अचानक सेंसर बोर्डातून आम्हाला एक फोन आला आणि त्यांनी म्हटलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तुमचा चित्रपट पाहायचा आहे. त्यांनंतर त्यांनी आम्हाला मेलही केला. आम्ही सगळेच आनंदी झालो. उत्साहीत होतो. 'गदर 2' ला एवढा मोठा सन्मान मिळत आहे. आम्हाला तर कळतच नव्हतं. रविवारी आम्ही राष्ट्रपती मुर्मू यांना भेटणार आहोत. त्यांच्यासोबत आम्ही चित्रपट पाहणार आहोत. आमच्या सगळ्यांसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. सगळी आनंदीत आहेत. सगळेच आनंद व्यक्त करत आहेत. हा चित्रपट आता आम्ही सगळेमिळून राष्ट्रपती भवनात पाहणार आहोत.
हेही वाचा : Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड
चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सनी देओल या चित्रपटात तारा सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अमीषा पटेल सकीनाच्या भूमिकेत. या चित्रपटाचा पहिला भाग हा 2001 साली प्रदर्शित झाला होता.