मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नापूर्वीची फंक्शन्स सुरू झाली आहेत. अलीकडेच, नुकताच अंकिता लोखंडेचा मेहंदी समारंभ पार पडला. ज्यामध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेंदी काढली आहे. जिने अंकिताच्या हातावर मेहंदी काढलीये ती दुसरी तिस कोणी नसून सेलिब्रिटी मेंदी कलाकार वीणा नागडा आहे.
वीणाने नुकतीच कतरिनाच्या हातावरही मेहंदी काढली होती. अंकिताच्या मेहंदीच्या सेरेमनीचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचबरोबर मेहंदी सोहळ्यात अंकिता-विकी जैनचा रोमँन्टिक डान्स सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल परफेक्ट जोडी
14 डिसेंबरला होणार लग्न
अंकिता आणि विकी 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचं लग्न हॉटेल ग्रँड हयातमध्ये होणार आहे. अंकिताच्या लग्नाचे फंक्शन तीन दिवस चालणार आहे. हा सोहळा 12 डिसेंबरला म्हणजेच आजपासून सुरू होईल, ज्यामध्ये सर्वप्रथम मेहंदी सोहळा पार पडला. त्यानंतर 12 तारखेला संध्याकाळी दोघांचा एंगेजमेंट सोहळा होणार आहे.
13 रोजी यलो थीम सेलिब्रेशन होईल आणि हळदी समारंभ होईल. यासोबतच 13 तारखेला इंडो-वेस्टर्न म्युझिकने संगीत सोहळा होणार आहे. त्यानंतर 14 तारखेला विकी आणि अंकिता लोखंडे एकमेकांशी लग्न करणार आहेत. रॉयल ट्रॅडिशनल स्प्लेंडर ही त्यांच्या लग्नाची थीम आहे. 14 तारखेला लग्नानंतरच संध्याकाळी रिसेप्शन पार्टीदेखील आयोजित करण्यात आली आहे.