'हवालदिल बळीराजाला मदतीचा हात द्या'

सर्व कलाकारांना प्रवीण तरडेंचं आवाहन    

Updated: Nov 15, 2019, 07:50 PM IST
'हवालदिल बळीराजाला मदतीचा हात द्या' title=

मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक राजकीय मंडळी नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत आहेत तर, दुसरीकडे समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट मत मांडणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे इतर कलाकारांना देखील मदतीचा एक हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. 

यापूर्वी कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकारांनी एक कोटींची मतद केली होती. त्यांचप्रमाणे १६ ट्रक अन्नधान्य आणि पाळीव प्राण्यांसाठी २ ट्रक पेडिग्री पाठवण्यात आली असल्याचं त्यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. 

शिवाय आता मदतीसाठी कलाकारांना एक नवीन कल्पना त्यांनी सुचवली आहे. 'राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे सर्व कारभार आता प्रशासनाच्या हातात आहे आणि प्रशासनाची शेतकऱ्याला सवय नाही. म्हणून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांना कशी वागणूक मिळते याची पाहणी आपल्या तालुक्यात जाऊन प्रत्येक कलाकाराने करावी' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.