प्रेमाखातर अभिनेत्रीनं गमवला जीव, आत्महत्येनंतर जुनं प्रेम प्रकरण समोर

प्रेमाखातर अभिनेत्रीनं अवघ्या 24 व्या वर्षी संपवलं आयुष्य   

Updated: Aug 10, 2022, 04:48 PM IST
प्रेमाखातर अभिनेत्रीनं गमवला जीव, आत्महत्येनंतर जुनं प्रेम प्रकरण समोर title=

मुंबई : मायानगरीत कित्येकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. स्वप्नांच्या नगरीत अनेकांच्या वाट्याला यश येतं, तर काहींना प्रतीक्षा करावी लागते. तर दुसरीकडे कलाकार यशाच्या उच्च शिखरावर पोहोचतात, पण ते स्वप्नांचा प्रवास अर्ध्यात सोडून जातात. 'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीने 2016 साली वयाच्या अवघ्या  24व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

अभिनेत्रीने राहत्या घरात गळफास घते झगमगत्या विश्वाला अखेरचा निरोप दिला. प्रत्यूषाची आत्महत्या आजही एक रहस्य आहे. आज प्रत्यूषाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही खास गोष्टी... 

आई, मला तुझ्या हातचं जेवण जेवायचं आहे : प्रत्युषा बॅनर्जी

प्रत्यूषाने  1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली. तेव्हा ती फक्त आणि फक्त 24 वर्षांची होती. अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंब आणि चाहत्यांच नाहीतर, संपूर्ण कला विश्वाला मोठा धक्का बसला. प्रत्यूषा अशा काळात जीवन संपवलं जेव्हा तिचं करियर यशाकडे वाटचाल करत होतं. चाहत्यांकडून देखील तिला प्रंचड प्रेम मिळत होतं.

बॉयफ्रेंड राहुल राजने केलेल्या फसवणुकीमुळे प्रत्युषा बॅनर्जी नाराज झाली होती. अभिनेत्रीच्या बेस्ट फ्रेंडने शोक सभेदरम्यान सांगितले होते की, राहुल राजची एक्स गर्लफ्रेंड प्रत्युषाचा खूप छळ करत होती, तर दुसरीकडे राहुल राजही तिला साथ देत नव्हता.

प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर आई- वडिलांची हलाखीची परिस्थिती; करतात 'हे' काम
 
प्रत्यूषाच्या बेस्टफ्रेंडने सांगितल्यानुसार, 'आत्महत्येच्या एक दिवस आधी मला प्रत्यूषाचा मध्यरात्री 2 वातजा कॉल आला होता. तेव्हा प्रत्युषा प्रडंच रडत होती. तिला राहुल लग्न करायचं होतं...' असं अभिनेत्रीची मैत्रिण लिनाने सांगितलं आहे. 

एवढंच नाहीतर, आत्महत्येनंतर प्रत्यूषाचं जुनं प्रेम प्रकरण बाहेर आलं. प्रत्यूषा टीव्ही स्टार विकास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये होती.. अशी अफवा रंगली. पण एका मुलाखतीत विकासने स्वतःच प्रत्युषासोबत संबंध असल्याची कबुली दिली होती. पण त्यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही.