चित्रपटाच्या सेटवर तब्बू गंभीर जखमी

 या चित्रपटादरम्यान तब्बूला जबर दुखापत झाली आहे. 

Updated: Aug 10, 2022, 04:47 PM IST
चित्रपटाच्या सेटवर तब्बू गंभीर जखमी title=

Actress Tabu Injured on Set: हल्ली स्टंटबाजीचा प्रकार बॉलीवूडमध्ये हमखास वापरला जातो कारण अॅक्शन फिल्म असेल तर त्यात स्टंट असल्याशिवाय भागतच नाही. अशाच एका अॅक्शन फिल्मसाठी स्टंट सीन शूट करणं तब्बूला महागात पडलं आहे. तब्बू सध्या भोला या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटादरम्यान तब्बूला जबर दुखापत झाली आहे. 

हैद्राबाद येथे तब्बू भोला या चित्रपटाचे शुटिंग करते आहे. या चित्रपटात तब्बू पोलिस निरिक्षकाच्या भुमिकेत आहे. अजय देवगणच्या 'भोला' या अॅक्शन चित्रपटाच्या सेटवर बुधवारी सकाळी अभिनेत्री तब्बू एका स्टंटचा अॅक्शन सिक्वेन्स करताना थोडक्यात बचावली. समोर आलेल्या माहितीनुसार एका अॅक्शन सीन दरम्यान ट्रक आणि मोटारसायकलची धडक झाल्यामुळे ही घटना घडली. टक्कर इतकी जोरदार होती की तब्बूच्या उजव्या डोळ्याच्य वरच्या भागाला काच लागली. 

हा अपघात घडल्यानंतर सेटवर तातडीने डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले. तब्बूला झालेली इजा किरकोळ आहे तेव्हा जखमेवर टाके भरण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या अपघातामुळे निर्माता अजय देवगणने तब्बूला आराम करण्याचा सल्ला दिला असून शूटिंगमधूनही काही काळ ब्रेक घेण्याचे सांगितले आहे. जोपर्यंत तब्बू पुर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला आराम करण्याची परवानगी देण्यात आली.

तब्बू लवकरच अजय देवगणच्या 'भोला' या अॅक्शन चित्रपटात एका निडर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बू नुकतीच 'भूल भुलैया 2' मध्ये अंजुलिका आणि मंजुलिका या दुहेरी भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला आणि तब्बूलाच्या अभिनयाचीही सर्वत्र प्रशंसा करण्यात आली आहे. 

सध्या तब्बू तिच्या आगामी 'भोला' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या शूटिंगदरम्यान तब्बू जखमी झाल्याची बातमी आज म्हणजेच बुधवारी सकाळी समोर आली आहे.