Prarthana Behere : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. प्रार्थनाचे लाखो चाहते आहेत. वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रार्थनानं सगळ्यांच्या मनात स्वत: चं एक स्थान निर्माण केलं आहे. त्यात काही दिवसांपूर्वी तिची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आली होती. या मालिकेतून तिची प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. इतर कलाकारांप्रमाणे प्रार्थच्या कामापेक्षा तिच्या खऱ्या आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत असते. तिच्याविषयी अनेक अफवा देखील ऐकायला मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की प्रार्थना ही प्रेग्नंट आहे.
प्रार्थनानं नुकतंच तिचं स्वतःचं युट्यूब चॅनेल सूरु केलं आहे. त्यात तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. त्यात तिच्या नव्या घराची एक झलक आणि मुंबई सोडून अलिबागला का गेली. यासगळ्या गोष्टी तिनं या व्हिडीओत सांगितल्या आहेत. 'मी आणि माझं जग' या नावाची सीरिज तिनं सुरु केली आहे. 'काही महिन्यांपूर्वी मी प्रेग्नंट आहे अशी अफवा ऐकली होती. त्या दिवसांमध्ये अनेक अभिनेत्री गरोदर होत्या आणि त्या त्यांच्या प्रेग्नंसीमध्ये पोलका डॉट्स असलेले ड्रेस घालत होत्या. तर त्यावेळी मीही तसाच एक ड्रेस घातला. तेव्हा अभिनेत्री पोलका डॉट घालते तेव्हा ती प्रेग्नंट असते असा जणू समज झालेला. त्यामुळे मीही प्रेग्नन्ट आहे असं सगळ्यांना वाटलं होतं.'
तर प्रार्थनानं तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवत अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी तिला विचारण्यात आलं होतं की तुमच्या कुटुंबात तुमच्या दोघांविषयी सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा होते? त्यावेळी प्रार्थना म्हणाली की 'माझ्या आणि अभिच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत असं त्यांना वाटतं. त्यात आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की आम्हाला मूल नकोय. पण आमच्या घरी जे श्वान आहेत तिच आमची मुलं आहेत. याबद्दल माझे आणि अभिचे विचार खूप सारखे आहेत आणि तेच माझ्या कुटुंबीयांना खूप आवडतात. आम्ही खूप खेळकर कपल आहोत. आम्ही सतत भांडत नसतो तर एकमेकांची मजा मस्करी करत असतो.' दरम्यान, प्रार्थनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा : शाहरुख अपयशी व्हावा अशी होती गौरीची इच्छा; समोर आलं विचित्र कारण...
प्रार्थना आणि अभिषेकनं 2017 मध्ये सप्तपदी घेतल्या. तर अभिषेक हा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. प्रार्थना आणि अभिषेक आता मुंबईकर राहिले नसून ते अलिबागला कायमसाठी स्थायिक झाले आहेत.