56 व्या वर्षी जयकांत शिखरेचं पुन्हा लग्न, मुलांच्या साक्षीने सोहळा संपन्न

प्रकाश त्यांची पहिली पत्नी ललिता कुमारीपासून 2009 मध्ये विभक्त झाले.

Updated: Aug 25, 2021, 12:18 PM IST
56 व्या वर्षी जयकांत शिखरेचं पुन्हा लग्न, मुलांच्या साक्षीने सोहळा संपन्न title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज, ज्यांनी 'सिंघम', 'वॉन्टेड' सारख्या चित्रपटांतील भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी 11 वर्षांपूर्वी पोनी वर्मासोबत लग्न केले. प्रकाश राज यांनी  या नात्याला 11 वर्षे पूर्ण झाल्याचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मुलांसमोर पत्नी पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केले आहे. या लग्नाचे कारण त्याची मुले देखील होती आणि त्यानी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे.

त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करताना प्रकाश राज यांनी सांगितले आहे की, त्यांनी पुन्हा एकदा  पत्नी पोनी वर्माशी लग्न केले आहे.कारण त्याचा मुलगा वेदांत त्याला पुन्हा लग्न करताना बघायचा होता.कौटुंबिक क्षण .. या फोटोंमध्ये प्रकाश राज पत्नी आणि मुलांसोबत दिसत आहे. एका चित्रात अभिनेता आपल्या पत्नीला किस करतानाही दिसत आहे.

24 ऑगस्टला  प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पुढे प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'हे इतके परिपूर्ण होते ... माझे इतके चांगले मित्र होण्यासाठी .. माझी प्रिय पत्नी एक मैत्रीण आणि एक अद्भुत सहप्रवासी होण्यासाठी धन्यवाद.'

प्रकाश राज यांचे 45 व्या वर्षी पोनीशी लग्न 
प्रकाश राज वयाच्या 45 व्या वर्षी पत्नी पोनीच्या प्रेमात पडले. 2010 मध्ये त्यांचे लग्न झाले. प्रकाश आणि पोनी एका चित्रपटाच्या सेटवर भेटले जेथे पोनी त्यांच्या एका गाण्याला कोरिओग्राफ करत होती.
 प्रकाश त्यांची पहिली पत्नी ललिता कुमारीपासून 2009 मध्ये विभक्त झाले. प्रकाश राज अलीकडेच मणिरत्नमच्या रिलीज झालेल्या मालिका नवरसामध्ये दिसला आहे.