मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा शेरशाह हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रिलीज होताच सगळीकडेच या सिनेमाचं कौतुक होत आहे. शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अॅमेझॉनवर प्रदर्शित झाला आहे. आता अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की पाकिस्तानमध्ये शेरशाह चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
चित्रपटावर बंदी, कोणी दिली माहिती?
एका पाकिस्तानी YouTuber ने त्याच्या YouTube चॅनेलद्वारे ही माहिती आता सर्वांसमोर सादर केली आहे. तो म्हणाले की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी असली, तरी तो पाहायचा आहे. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज झाला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही.
मात्र, जेव्हापासून ही गोष्ट समोर आली आहे, तेव्हापासून चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक असा अंदाज लावत आहेत की पाकिस्तानला कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा दाखवायची नाही, त्यामुळे चित्रपटावर बंदी घातली गेली असावी. चित्रपटात दाखवण्यात आले की, त्याच्या जीवाची पर्वा न करता विक्रम बत्राने पाकिस्तानींना मारले होते.
पाकिस्तानात चित्रपटावर बंदी
तसे, पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटावर बंदी घालण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी फँटम चित्रपटावर बंदी होती, हा चित्रपट हुसेन जैदीच्या 'मुंबई अवेंजर्स' या कादंबरीवर आधारित होता. बांगिस्तान, एक था टायगर, राजहाना, भाग मिल्खा भाग, एजंट विनोद, तेरे बिन लादेन, लाहोर असे अनेक सिनेमे आहेत ज्यांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
आता चाहत्यांच्या नजरा अधिकृत विधानावर आहेत, जेव्हा शेरशाहचे निर्माते स्पष्ट करतात की या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये खरोखर बंदी आहे की नाही.