मन वेडे गुंतले; म्हणत प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या 'त्या' फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2023, 02:17 PM IST
मन वेडे गुंतले; म्हणत प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या 'त्या' फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष  title=
(Photo Credit : Prajakta Mali Instagram)

Prajakta Mali : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता ही सध्या तीन अडकून सीताराम या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असते. या चित्रपटातील तिची वेगळी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटो पेक्षा प्राजक्ता माळीनं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्तानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. प्राजक्ता या साडीत खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत प्राजक्तानं प्राजक्ताराजसाजचे दागिने घातले आहेत. तिचा लूक वेगळाच खूलुन आला आहे. तर हे फोटो शेअर करत प्राजक्ता कॅप्शन देत म्हणाली की 'ना कळे.. कधी कुठे, मन वेडे गुंतले…पाहिले न मी तूला…' प्राजक्तानं असं कॅप्शन का दिलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर. प्राजक्तानं कॅप्शनमध्ये तिचं हे आवडतं गाणं असल्याचं तिनं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, तू साडी मध्ये खूप गोड,सुंदर, प्रेमळ जणू काही सगळंच तू. दुसरा नेटकरी म्हणाला, कुठेतरी नाही ग तुझ्यातच गुंतले. तिसरा नेटकरी म्हणाला की पाहिले न मी तुला तू मला न पाहिले कधी कुठे मन वेडे गुंतले……! माझ ही आवडतं गाण आहे हे. आणखी एक नेटकरी म्हणाला, आई शप्पथ प्राजू सुंदर आणि हॉट दिसत आहे  मी तुझ्यावर खूप प्रेम करते प्रिये आज तू सुंदर चांदण्यासारखी दिसत आहेस. 

हेही वाचा : प्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची 

प्राजक्ताविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच तीन अडकून सीताराम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 29 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, गौरी देशपांडे दिसत असले तरी चित्रपटात आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.