'मीटू'वर जे बोलायला नको तेच बोलून बसली 'ही' अभिनेत्री, वाचा काय?

परंतु सध्या एका अभिनेत्रीने मात्र परत 'मीटू'ची आठवण काढली आहे आणि जे बोलायला नको तेच बोलले आहे. 

Updated: Jul 14, 2022, 08:24 PM IST
'मीटू'वर जे बोलायला नको तेच बोलून बसली 'ही' अभिनेत्री, वाचा काय?  title=

मुंबईः गेल्या चार वर्षात थंड झालेले 'मीटू' प्रकरण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातून मधूनमधून 'मीटू'वर बोलणाऱ्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. परंतु मध्यतंरी ते प्रकरण इतके मावळे होते की त्यावर फारसे कोणीच बोलत नव्हते. परंतु सध्या एका अभिनेत्रीने मात्र परत 'मीटू'ची आठवण काढली आहे आणि जे बोलायला नको तेच बोलले आहे. 

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार हे बराच काळ गायब राहिले होते त्यातून त्यांना ओटीटीमुळे पुन्हा एकदा संजीवनी मिळाली आहे ज्यात बॉबी देओल, रविना टंडन, सुष्मिता सेन, अभिषेक बच्चन अशी अनेक नावं घेता येतील. त्यातच आता प्राची देसाई हे नावही पुढे आलं आहे. सध्या ती तिच्या 'फॉरेन्सिक' या वेबमालिकेमुळे भलतीच चर्चेत आली आहे. 

प्राचीच्या मते, अजूनही भारतीय समाज हे फारच मागसलेले असून अजूनही जशी प्रगती व्हायला पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. आजही अनेक सेलिब्रेटी 'मीटू'वरून उघडपणे बोलत नाहीत तर आजही ते घाबरतात कारण अजूनही आपल्या इथे तितकीशी मोकळीक नाही आणि सोबतच काही बोललेच तर त्यावर आजूबाजूची लोकं अनेक प्रश्न उपस्थित करतात. 

प्राचीला वाटते की भारतीय समाज अद्याप पुरेसा विकसित झालेला नाही आणि म्हणूनच बॉलीवूड स्टार्स त्यांच्या MeToo कथेबद्दल क्वचितच व्यक्त होतात. जेव्हा हॉलिवूडमधील हार्वे वाइनस्टीन प्रकरणात जे घडले त्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्या दोषींना इथल्या सेलिब्रिटी हिरोईन्स का खडसावत नाहीत असा प्रश्न तिने उपस्थित केला. त्यावर ती पुढे म्हणाली की याला व्हिक्टम शेमिंग सिंड्रोममुळे जबाबदार आहे जे आजही भारतीयांमध्ये आहे ज्यामुळे अनेक जण आजही अनेक गोष्टी सांगायला कचरतात. 

प्रत्येकाला बोलायला, व्यक्त होयला काहीतरी माध्यम नाहीतर कोणी व्यक्ती हवी असते परंतु तसा माहोल कुठेच नाही. इथे जर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर गोष्टी समजून घेण्याऐवजी त्या व्यक्तीला हजारो प्रश्न विचारले जातात. मला वाटते की व्हिक्टम शेमिंग सिंड्रोम अजूनही भारतात खूप प्रचलित आहे, म्हणूनच लोक याबद्दल बोलू इच्छित नाहीत, असे प्राची देसाईनं बिनधास्त सांगितलं.