रविवारच्या सुट्टीला पाहा सुपरस्टार प्रभासनं रेकमेंड केलेला चित्रपट; IMDb वर मिळालीये 9.5 रेटिंग

प्रभासनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Oct 15, 2022, 01:42 PM IST
रविवारच्या सुट्टीला पाहा सुपरस्टार प्रभासनं रेकमेंड केलेला चित्रपट; IMDb वर मिळालीये 9.5 रेटिंग title=

मुंबई : सध्या सगळीकडे 'कांतारा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि दाक्षिणेत तो हिट ठरला. अभिनेता किचा सुदीप आणि धनुष यांनी त्याची प्रशंसा केली होती. आता या यादीत 'बाहुबली' अभिनेता प्रभासचे नावही सामील झाले आहे. हा चित्रपट त्याला इतका आवडला की त्याने तो दोनदा पाहिला. या चित्रपटाविषयी प्रभास आणखी बऱ्याच गोष्टी बोलला आहे. 

प्रभासनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'कंतारा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दुसऱ्यांदा #Kantara पाहिला. हा अतिशय विलक्षण अनुभव होता. उत्कृष्ट संकल्पना आणि थरारक क्लायमॅक्स. थिएटरमध्ये पाहण्यासारखा चित्रपट.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'कांतारा'चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनं केलं आहे. होंबले प्रोडक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युत कुमार मुख्य भूमिकेत आहेत. सर्व कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आतापर्यंत अनेक नामवंत सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यामध्ये किचा सुदीप, धनुष आणि अनिल कुंबळे यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश आहे. KGF चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील देखील या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी आता हा चित्रपट हिंदीसह आणखी तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदीत रिलीज झाला आहे. तर हा चित्रपट 15 ऑक्टोबरला म्हणजेच आज तामिळ भाषेतही रिलीज झाला. या चित्रपटाला IMDb वर 9.5 रेटिंग मिळाले आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सनं सगळ्यांना वेड लावलं आहे.