'सालार' च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक! काय आहे कारण?

Prabhas Takes Break after Salaar Success :  'सालार'च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय! नक्की काय आहे त्या मागचं कारण जाणून घ्या

दिक्षा पाटील | Updated: Jan 31, 2024, 11:08 AM IST
'सालार' च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक! काय आहे कारण?  title=
(Photo Credit : Social Media)

Prabhas Takes Break after Salaar Success : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'सालार पार्ट 1: सीजफायर' या चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटाला मिळालेलं यश सालारची संपूर्ण टीम एन्जॉय करत आहेत. तर आता प्रभास सध्या चर्चेत येण्याचं कारण त्याचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट आहे. दुसरीकडे प्रभासच्या चाहत्यांसाठी सगळ्यांना आश्चर्यात पाडणारी एक गोष्ट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रभास काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेत आहे. दरम्यान, प्रभास अभिनयातून ब्रेक घेण्याचं कारणही समोर आलं आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'सालार'ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमानं प्रभासला आनंद झाला. त्यांनी दिलेल्या या प्रेमासाठी तो चाहत्यांचा आभारी आहे. आता त्यांच्या मेंदुला आणि काही स्किल्स रिफ्रेश करण्यासाठी ब्रेक घेणार आहे. रिपोर्ट्सनुसार, तर प्रभासला त्याच्या आरोग्यावर देखील जरा लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे या वर्षी मार्च महिन्यात तो कामावर परतेल. तो पर्यंत तो एक छान असा छोटा ब्रेक घेत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास सर्जरी करण्यासाठी यूरोपला जाण्याची शक्यता आहे. काही काळापूर्वी प्रभासला दुखापत झाली होती. ज्यातून अजून तो पूर्णपणे ठीक झालेला नाही. दरम्यान, प्रभासनं तो अभिनयातून ब्रेक घेणार असणाऱ्या या बातमीवरून कोणतंही ऑफिशिअस स्टेटमेंट किंवा दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा : 'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ते 'द मार्वल्स' 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

 

'बाहुबली 2' च्या सक्सेसच्या 6 वर्षांनंतर प्रभासनं 2023 मध्ये 'सालार पार्ट 1' ब्लॉकबस्टर ठरली. त्याचं कारण म्हणजे 'बाहुबली 2' नंतर एकामागे -एक असे त्याचे तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे 'सालार पार्ट 1' ला मिळालेलं यश हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता प्रभासच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते करत आहेत. प्रभासकडे सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन आहेत. या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दिशा पाटनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरिट', 'सालार पार्ट 2' आणि 'द राजा साहब' हे तीन चित्रपट देखील आहेत. तर 'द राजा साहब' या चित्रपटात त्याच्यासोबत मालविका मोहन, निधि अग्रवाल त्याच्यासोबत दिसणार आहेत.