एक दिवसाचा पंतप्रधान झालास तर काय करणार, प्रभासचं मजेदार उत्तर

कपिल शर्माच्या प्रश्नावर मजेदार उत्तर

Updated: Aug 23, 2019, 05:18 PM IST
एक दिवसाचा पंतप्रधान झालास तर काय करणार, प्रभासचं मजेदार उत्तर title=

मुंबई : 'बाहुबली' अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चा आगामी सिनेमा 'साहो' (Saaho) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रभास, श्रद्धा आणि नील नितीन मुकेश हे कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये आले होते. कपिलने सगळ्या स्टार्सला प्रश्न विचारले. पण प्रभासला जेव्हा त्याने विचारलं की, त्य़ाला एका दिवसासाठी पंतप्रधान केलं तर तो करेल?. यावर त्याने खूप मजेदार उत्तर दिलं.

सोनी चॅनेलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रभास, श्रद्धा आणि नीलने कपिलच्या मजेदार प्रश्नांना उत्तरं दिली. कपिलने प्रभासला जेव्हा विचारलं की, 'त्याला एक दिवसासाठी पंतप्रधान केलं तर तो काय करेल?' यावर प्रभासने म्हटलं की, 'मी इंडस्ट्रीला मुलाखती देणं बंद करेल.'

'द कपिल शर्मा शो' मध्ये 'साहो'च्या टीमने धमाल केली. साहो हा सिनेमा ३० ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा भारतातील सर्वात मोठा अॅक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी ३५० कोटी खर्च करण्यात आले आहेत.