कोणी 'थाला' कोणी 'मक्कल सेल्वन'; दाक्षिणात्त्य सुपरस्टार्सच्या 'या' Popular Titles मागची खरी कहाणी काय?

Honorary titles of south Indian actors given by Fans: चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना त्यांच्या वेगळ्या अशा नावानं (Nicknames of South Indian Superstar) ओळखलं जातं. असेच काही दक्षिणेतीलही सुपरस्टार्स आहेत ज्यांना त्यांच्या फॅन्सकडून (Story Behind South Indian Superstars Famous Titles) लोकप्रिय नावं मिळाली आहेत. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की यामागील रंजक कथा काय आहेत? 

Updated: Apr 19, 2023, 01:16 PM IST
कोणी 'थाला' कोणी 'मक्कल सेल्वन'; दाक्षिणात्त्य सुपरस्टार्सच्या 'या' Popular Titles मागची खरी कहाणी काय?  title=

Popular Titles of South Indian Actors: साऊथ इंडियन अभिनेत्यांची नाव घेतली की तुमच्यासमोर पहिल्यांदा काय येतं? रजनीकांत... पुष्पा नाहीतर 'थाला' किंवा 'थलपती' असे शब्द. परंतु तुम्हाला माहितीये का की दाक्षिणात्त्य सुपरस्टार्सना फक्त स्टार्स (South Indian Fans Names) म्हणूनच संबोधलं जात नाही तर त्यांना विशेष अशा नावांनी इंडस्ट्रीत ओळखले जाते जी नावं त्यांनी त्यांच्या फॅन्सनीच दिली आहेत. या सगळ्या नावांमागील कहाणी काय आहे हे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. दाक्षिणेत कलाकारांना (South Indian Nicknames Stories) या नावांमुळेच एक वेगळी ओळख मिळाली आहे.

तुमचे आवडते दाक्षिणात्त्य सुपरस्टार्स नक्की कोणत्या नावांनी ओळखले जातात व त्यांच्यामागील रंजक कथा काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तेव्हा सुरूवात करूयात एव्हरग्रीन सुपरस्टार रजनीकांत यांच्यापासून. (Popular titles of south Indian actors given by their fans know the interesting story behind it nickname of south indian actor)

रजनीकांत 

रजनीकांत (Rajnikant) हे दाक्षिणात्त्य नव्हे तर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. शिवाजीराव गायकवाड असं त्यांचं खरं नाव आहे. त्यांनी 1970 च्या काळात आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. 1978 साली आलेल्या 'भैरवी' या चित्रपटाच्यावेळी प्रमोशनसाठी त्यांच्या नावापुढे सुपरस्टार लिहिण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या चित्रपटांनुसार त्यांना त्यांचे फॅन्स 'लीडर', 'बॉस' तर तामिळमध्ये 'थलाइवा' असे संबोधू लागले.

कमल हसन 

कमल हसन (Kamal Hassan) यांचा 'एक दूजे के लिए' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा 'भारताचा नंबर वन सुपरस्टार' म्हणून त्यांना पोस्टरमध्ये संबोधले गेले. त्यानंतर त्यांचे असेच एकाहून एक चित्रपट गाजू लागले आणि त्यांना त्याच्या फॅन्सनी 'उलगनायगन' किंवा युनिवर्सल हिरो म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यांना 'नम्मावर' या नावानंही ओळखलं जातं. 

हेही वाचा - Arshad Warsi Birthday: घरोघरी लिपस्टिक विकून पोट भरणारा मुन्नाभाईचा 'सर्किट' 111 कोटींचा मालक कसा झाला?

विजय सेतूपती 

विजय सेतुपती याला 'मक्कल सेल्वन' या (Vijay Setupati) नावानं ओळखलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना हे नावं दिग्दर्शक सीनू रामस्वामी यांनी 'धर्मदुराई' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दिलं आहे. या टायटलसोबतच त्यांना 500 रूपये मिळाले अशीही आठवण आहे. 

विजय 

विजय यांनी 'थलपति' (Vijay) या नावानं ओळखलं जाऊ लागले. त्यांच्या 1994 साली आलेल्या 'रसिगन' या चित्रपटानंतर त्यांना 'इलयाथलपति' असंही टायटल मिळालं. 

दाक्षिणात्त्य सुपरस्टारची सध्या सगळीकडेच क्रेझ आहे. त्यांच्या या नावांचा फायदा चित्रपटाच्या यशासाठीही होतो अशीही चर्चा मीडियामध्ये रंगते. सुपरस्टार्सना दक्षिणेत एक वेगळा दर्जा आहे. साऊथ इंडियन चित्रपट हे भलतेच गाजतात. आता प्रेक्षकांसाठी पुष्पा 2 हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.