पूनम पांडे रुग्णालयात दाखल, अभिनेत्री मारहाणीत गंभीर जखमी

अभिनेत्री पूनम पांडेने पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.

Updated: Nov 9, 2021, 04:32 PM IST
पूनम पांडे रुग्णालयात दाखल, अभिनेत्री मारहाणीत गंभीर जखमी  title=

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडेने पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. वांद्रे पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पूनम पांडेने मारहाण केल्याची तक्रार केली आणि यानंतर लगेच याच्या विरोधात कारवाईही करण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर पूनमला रुग्णालयात दाखलं केलं आहे. या मारहाणीमध्ये पूनमला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीमध्ये तिच्या डोक्याला, डोळ्यांना आणि चेहऱ्याला जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

लग्नानंतर लगेच दुरावा
याआधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने गोव्यात तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली होती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. लग्नाआधी ते जवळपास २ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी अभिनेत्री पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅमसोबत लग्न केलं. लग्नाच्या १२ दिवसांनंतरच त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

याआधी गोवा पोलिसांनी केली होती अटक
गेल्यावर्षी पूनम पांडेने पती विरोधात छेडछाड, धमकी देण्यासाठी आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर सॅमला गोवा पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा पूनम पांडेच्या एफआयआरवर सॅम बॉम्बेला अटक केलं आहे.   

कोण आहे सॅम बॉम्बे
सॅम बॉम्बेचा जन्म संयुक्त अरब अमीरातच्या दुबईमध्ये झाला. तो एक ऍड फिल्म निर्माता आहे. ३६ वर्षीय सॅम अक्षय कुमार, रणबीर कपूर, दिपीका पदुकोण,जॅकलिन याचबोरबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत त्याने प्रोजेक्ट केले आहेत.