रिवीलिंग बिकिनी टॉप घालून फिरायला निघाली पूनम पांडे, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल एवढी घाणेरडी फॅशन कुणीही करु नये...

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 

Updated: Feb 19, 2022, 05:51 PM IST
रिवीलिंग बिकिनी टॉप घालून फिरायला निघाली पूनम पांडे, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल एवढी घाणेरडी फॅशन कुणीही करु नये... title=

मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही अभिनेत्री मुंबईतील एका कॉफी शॉपमध्ये दिसली. यादरम्यान पूनम पांडे कॅज्युअल लूकमध्ये दिसली. मात्र तिच्या दिसणार्‍या बिकिनी टॉपने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. यासोबतच तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

पूनम पांडे पिंक कलरच्या बिकिनी टॉप आणि लोअरमध्ये  फोटोत दिसून येत आहे. पूनम पांडेने लूक पूर्ण करण्यासाठी स्टायलिश बिकीनी टॉप जो पिकं शेड्समध्ये होता. याचबरोबर तिने पिंक स्लिंग बॅग, गोल्डन हूप्ससोबतच तिचा लूक पूर्ण केला. पूनम पांडेच्या या ग्लॅमरस स्टाइलमुळे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे.  

या ग्लॅमरस लूकमुळे पूनम पांडेही ट्रोल होत आहे. पूनमला तिच्या बिकिनी टॉपमुळे ट्रोल केलं जात आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बिकिनी टॉपच्या विचीत्र आकारावर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, लोकं लाजतील एवढे छोटे कपडे तुम्ही का घालतात. तर अजून एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, अरे यार, असे लोकं पब्लिसीटीच्या नावावर काहीही घालतात. यांना लाज नाही कारण ते जाणूनबुजून अंग दाखवतात.अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत लोकं तिला ट्रोल करत आहेत.
 
सध्या कंगना राणौतच्या 'लॉकअप' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान पूनम पांडे सहभागी झाल्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, पूनम पांडे अलीकडेच तिचा पती सॅम अहमदपासून विभक्त झाली आहे.

पूनम पांडे आणि सॅम यांचं सप्टेंबर २०२० मध्ये लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी पूनम पांडेने सॅमवर शारीरिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले. तिने गोव्यात तक्रारदेखील दाखल केली होती.