Nude Video शूट करणाऱ्या पूनम पांडेची सुटका

Goa मध्ये पूनम पांडेचं आक्षेपार्ह व्हिडिओ शूट 

Updated: Nov 6, 2020, 03:37 PM IST
Nude Video शूट करणाऱ्या पूनम पांडेची सुटका title=

गोवा : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेला (Poonam Pandey) 'त्या' व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी जामीन मिळाला आहे. या प्रकरणी पूनम पांडेला २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.  पूनम पांडे आणि तिच्या नवऱ्याला सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. 

पूनम पांडे ही सप्टेंबर महिन्यात गोव्यात गेली होती. तिथे तिने धरणावर फोटो शूट केले होते. या वादग्रस्त फोटो शूट प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याने  मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sam Bombay (@sambombay) on

पूनम पांडेला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडे हिच्याजवळ  उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.

पूनम पांडे पहिल्यांदाच वादात अडकली नाही, ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच आहे. अनेकदा तिनं विवादात्मक विधान करुन बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली आहे. २०११  साली झालेल्या विश्वचषकाच्या वेळी पूनम वादात सापडली होती. विश्वचषक सुरु झाल्यावर लगेचच पूनमने सोशल मीडियावर सेमी न्यूड फोटो पोस्ट करत या फोटोंद्वारे मी भारतीय संघाला प्रेरित करत आहे असं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे बरेच वाद निर्माण झाले होते.