बनावट रुपामुळे बॉलिवूडची 'क्वीन' ट्रोल

तिच्यावर टीका होण्याचं प्रमाण जास्त होतं.

Updated: Nov 24, 2019, 11:47 AM IST
बनावट रुपामुळे बॉलिवूडची 'क्वीन' ट्रोल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : खेळाडू, राजकारणी किंवा मग एखाद्या प्रभावी व्यक्तीमत्त्वाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत चित्रपट साकारण्याला बॉलिवूडमध्ये प्राधान्य देण्यात आलं. हा ट्रेंड इथे चांगल्या प्रकारे स्थिरावलासुद्धा. यातच एका नव्या चित्रपटाची भर पडली. तो चित्रपट म्हणजे थलायवी. 

तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या, जे. जयललिता यांच्या कुतूहलपूर्ण जीवनप्रवासावर या चित्रपटातून भाष्य करण्यात येणार आहे. अशा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अभिनेत्री कंगना रानौत यामध्ये मुख्य भूमिकेत झळकली. अभिनयाच्या रंगमंचापासून राजकारणाच्या व्यासपीठापर्यंत जयललिता कशा प्रकारे त्यांच्या कारकिर्दीच्या कक्षा रुंदावत गेल्या याचा अंदाज हा काही सेकंदांचा टीझर सांगून गेला. 

कायमच काही आव्हानात्मक भूमिकांचा स्वीकार करत प्रभावीपणे त्या रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या कंगनाचं 'थलायवी' रुपही नेमकं कसं असेल याची चाहत्यांचा उत्सुकता होती. पण, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर जितकी त्याची प्रशंसा झाली त्याहून त्यावर टीका होण्याचं प्रमाण जास्त होतं.

अरेच्चा! ही तर हुबेहूब मधुबाला....

जयललिता यांच्या रुपाशी मिळताजुळता मेकअप करण्यासाठी आणि या भूमिकेसाठी ज्याप्रमाणे तिच्यात बदल करण्यात आले हे काही नेटकऱ्यांना रुचले नाहीत. एक किलोचा मेकअप लावल्याप्रमाणे ती दिसत असल्याच्या खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रिया देत चाहत्यांनी कंगनाचं हे बनावट रुप न आवडल्याचं म्हणत तिची खिल्ली उडवली. 

कोणी तिच्या या लूकची तुलना स्मृती इराणींशी केली. तर कोणी, अरे हे काय.......? असं म्हणत कंगना आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याविषयी नाराजीचा सूर आळवला. विजय दिग्दर्शित 'थलायवी' हा चित्रपट २६ जून २०२०ला प्रदर्शित होणार आहे. 'रोझा' फेम अभिनेता अरविंद स्वामीसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे.