बॉलिवूड अभिनेता मोदींना का म्हणाला 'Good opposition'?

पंतप्रधानांनी दिलं हटके उत्तर 

Updated: Sep 18, 2020, 04:08 PM IST
बॉलिवूड अभिनेता मोदींना का म्हणाला 'Good opposition'? title=

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये नेते मंडळी, जगभरातील मान्यवर व्यक्ती अशा अनेकांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या. यातील एक ट्विट सर्वात जास्त चर्चेत आलं ते ट्विट आहे सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचं. 

मिलिंद सोमण सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव असतो. मिलिंद सोमण अनेकदा आपले आणि आपल्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मिलिंद सोमण यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिलिंद सोमणने केलेलं ट्विट एवढं आवडलं की, त्यांनी स्वतः रिप्लाय केला आहे. 

मिलिंद सोमणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय,'प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या ७० व्या वाढदिवसादिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि तुम्हाला चांगल्या, सक्रिय विरोधाच्या शुभेच्छा देतो. आमच्या महान देशाच्या दृष्टीने तुम्हाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतो. 

मिलिंद सोमणची शुभेच्छा देण्याची पद्धत मोदींना पसंत आल्यामुळे त्यांनी रिप्लाय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून रिट्विट करताना म्हटलंय की, 'जन्मदिवसाच्या शुभेच्छा आणि महत्वाकांक्षी विचार दिल्यामुळे आभारी आहे.' हे ट्विट सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिलिंद सोमण हे मॉडेलिंग क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. ९० च्या दशकातील सुपर मॉडेल आहे. मिलिंदचा चाहता वर्ग देखील खूप आहे. मिलिंदच्या फिटनेसचे सगळेच दिवाणे आहे. मिलिंदचं वय ५५ वर्षे आहे.