अजय देवगण कायद्याच्या कचाट्यात, लखलखत्या कारकिर्दीचं काय होणार?

अजय देवगण या कारणामुळे अडकलाय कायद्याच्या कचाट्यात...

Updated: Oct 13, 2022, 12:01 PM IST
अजय देवगण कायद्याच्या कचाट्यात, लखलखत्या कारकिर्दीचं काय होणार? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'थॅंक गॉड'मुळे (Thank God) चर्चेत आहे. या चित्रपटात अजय चित्रगुप्तची भूमिका साकारत आहे. दरम्यान, या भूमिकेमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. एवढंच काय तर या संबंधीत याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

हेही वाचा : अंकिता लोखंडेकडे गुडन्यूज; Photo शेअर करत काय म्हणतेय एकदा पाहाच

वकील मोहन लाल शर्मा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 'या चित्रपटातून चित्रगुप्ताचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.' तर कायस्थ समाजाचं म्हणणं आहे की ते चित्रगुप्ताची पूजा करतात आणि या चित्रपटातून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. हे सहन केलं जाणार नाही. याशिवाय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये समाजावर पडणाऱ्या प्रभावाबद्दलही बोललं गेलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास देशातील शांतता आणि समजूतदारपणा यावर परिणाम होऊ शकतो, असं मोहन लाल शर्मा त्यांच्या याचिकेत म्हणाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'दृश्यम 2' विजय साळगावकरच्या अडचणीत होणार वाढ, तब्बु साकारणार 'ही' भूमिका

दरम्यान, कायस्थ समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सक्सेना यांनी या चित्रपटाबाबत अजय देवगण आणि चित्रपट निर्माते टी-सीरीजविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. (plea against the ajay devgn sidharth malhotra rakul preet singh thank god movie in supreme court to ban it) 

आणखी वाचा : सतत चित्रपट फ्लॉप होऊनही अक्षयनं 'रामसेतू'साठी घेतलं इतकं मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये चित्रगुप्त आधुनिक अवतारात दाखवण्यात आला आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ हा कॉमेडी चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणशिवाय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची (Rakul Preet Singh) महत्त्वपूर्ण भूमिका आहे.