जगभरात गाजलेल्या 'या' महिला DJ ला अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी

Female DJ : ही कुठली मानसिकता? तिला धमकी का मिळालं यामागचं कारण वाचून हादराल. आपण कोणत्या युगात राहतोय आणि हे सर्व काय सुरुये हाच प्रश्न सतावू लागेल. 

Updated: Oct 13, 2022, 12:05 PM IST
जगभरात गाजलेल्या 'या' महिला DJ ला अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी title=
Pakistan first female DJ neha khan get rape and death threat

Pakistan First DJ Empowering story: असं म्हणतात की 21 शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. पण, खरंच असं आहे का? खरंच महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये स्वीकृती मिळालीये का? या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हीही काही क्षण विचार कराल. कारण, एका झटक्यात तुम्ही या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर देऊच शकत नाही. ही चर्चा होण्याचं कारण ठरतेय पाकिस्तानची एकमेव महिला DJ आर्टिस्ट नेहा खान (DJ Neha Khan). ती आज यशाच्या शिखरावर असली तरीही याच कामामुलं तिच्यावर अनेकंनी निशाणा साधला, गर्दीत ती एकटीच महिला आर्टिस्ट असल्यामुळं तिच्यावर अनेकांचा रोषही ओढावला. 

E म्युझिकसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या नेहानं आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीचा खुलासा एका मुलाखतीत केला. कॅनडाला (canada) असताना तिला संगीताचं वेड लागलं. पुढे शिक्षण घेतल्यानंतर ती पाकिस्तानला (Pakistan) परतली पण, इथे मोठ्या आवाजात संगीत दिग्दर्शन करण्याच्या तिच्या कलेवर टीकांची झोड उठली. 2021 मध्ये हुन्जा फेस्टमध्ये (Hunza Fest) नेहानं तिची कला सादर केली, पण त्यानंतर तिचं जगणं कठीण झालं. 

काहीतरी हटके: Video पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'... 

इथूनच तिला धमक्या येण्यास सुरुवात झाली. फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले. तिला जीवानिशी मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत ती मायदेशी परतू शकत नव्हती. कारण, विमानतळावरच तिचं शीर धडापासून वेगळं करण्याची धमकी देण्यात आली होती. 

ज्या फेस्टिव्हलपासून नेहाला धमक्या येण्यास सुरुवात झाली त्यामध्ये 5 पुरुषांसोबत ती सहभागी झाली होती. मुस्लिम धर्माचा पगडा असणाऱ्यांना ही बाब खटकली होती. आपल्याच देशातील नागरिकांकडून असं धमकावलं जाणं तिला हादरवून गेलं. जिथं पुरुषांचा अभिनय आणि त्यांचा या क्षेत्रातील वावर स्वीकारला जातो तिथं नवोदित कलाकारांना असं धमकावणं योग्य नसल्याचं म्हणत तिनं या वृत्तीचाच निषेध केला.