संजय दत्तच्या ‘भूमी’त सनीच्या डान्सचा तडका, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागली आहे.

Updated: Aug 14, 2017, 09:14 AM IST
संजय दत्तच्या ‘भूमी’त सनीच्या डान्सचा तडका, फोटो व्हायरल title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागली आहे.

तसेच या सिनेमात संजय दत्त एका तरूण मुलीच्या बापाची भूमिका साकारतो आहे. त्यामुळेही सिनेमाची चर्चा होत आहे. सनी लिओनीने संजय दत्त याच्या नायक नहीं खलनायक हूं’ या गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यासोबत तिने संजय दत्ताच्या सिनेमाच्या गुड लक दिले होते. आता अशी बातमी आहे की, या सिनेमात सनी लिओनीचा एक डान्स नंबर या सिनेमात बघायला मिळणार आहे. सनीने हे गाणं शूट केलं असून याचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत.  

sunny leone

sunny leone

sunny leone

sunny leone

sunny leone

संजय दत्तसाठी ‘भूमी’ हा सिनेमा फारच खास आहे. कारण तब्बल तीन वर्षांनंतर तो कॅमेरासमोर आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केलं असून यात अदिती राव हैदरी ही संजत दत्तच्या मुलीच्या भूमिकेत आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

(फोटो साभार- bollywoodlife.com)