दीपिका पदुकोणच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर; निर्मात्यांकडून मोठी माहिती

दीपिका पदुकोण तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात  प्रसिद्ध साऊथ अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे.

Updated: Jun 21, 2022, 10:09 PM IST
दीपिका पदुकोणच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर; निर्मात्यांकडून मोठी माहिती title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दीपिका पदुकोण तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात  प्रसिद्ध साऊथ अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे. काही काळापूर्वी दीपिकाची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली होती.

रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्याहार्ट रेट अचानक वाढली आणि तिला हैद्राबादच्या कमिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी दत्ताने दीपिकाच्या प्रकृती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.

निर्मात्यांनी सांगितलं की, 'दीपिका हैद्राबादमध्ये चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि तिची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. तिची तब्येत बिघडलीही नव्हती. उलट ती रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी गेली होती. कारण ती अलीकडेच कोविड 19 मधून बाहेर आली होती. पण बरी झाल्यानंतर ती युरोपला निघून गेली.

अश्विनी दत्ता पुढे म्हणाली, "आणि थेट युरोपमधून ती आमच्या चित्रपटाच्या सेटवर आली. तिच्या बीपीमध्ये थोडा चढउतार झाल्यानंतर, सर्व काही सामान्य आहे याची पुष्टी करण्यासाठी ती नियमित तपासणीसाठी एक तासासाठी रुग्णालयात गेली".

अश्विनी पुढे म्हणाली, 'दीपिका पूर्णपणे प्रोफेशनल आहे. चित्रपट निर्माते आणि युनिटची इच्छा होती की तिने पूर्ण विश्रांती घ्यावी आणि एक दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी, मात्र तपासणीनंतर ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूट करण्यासाठी परतली. ती खूप मेहनती आहे'. निर्मात्यांनी पुढे सांगितलं की, दीपिका चित्रपटाच्या प्रोजेक्टच्या शूटिंगचा आनंद घेत आहे. चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत होतं, दीपिकामुळे सेटवर खूप सकारात्मक वातावरण आहे. दीपिकाच्या हातात सध्या ३ चित्रपट आहेत.