सलमानचं 'त्या' मिस्ट्री गर्लला किस; दिले प्रेमाचे संकेत?

 मात्र सलमानचा मिस्ट्री गर्लसोबतचा  हा फोटो जेव्हा समोर आला तेव्हा सलमानच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.

Updated: Nov 7, 2022, 10:39 PM IST
 सलमानचं 'त्या' मिस्ट्री गर्लला किस; दिले प्रेमाचे संकेत? title=

मुंबई : सलमान खान लग्न कधी करणार याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र सलमान काही लग्नाचं नाव घेताना दिसत नाहीये. अनेकदा सलमानचे असे फोटो व्हायरल होतात. ज्यामुळे सलमानच्या लिंकअपच्याही बातम्या समोर येतात. नुकताच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत तो एका मिस्ट्रीगर्लसोबत दिसत आहे.  

खरंतर व्हायरल होणारा हा फोटो जुना आहे. हा फोटो आहे  बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या फिनालेदरम्यान, शोचा होस्ट आणि दबंग अभिनेता सलमान 'बिग बॉस 15' संपताच  एक फोटो समोर आला आहे जो तीन फोटोंचा कोलाज आहे. या फोटोत भाईजान एका मुलीसोबत एकदम बिंधास्त स्टाईलमध्ये दिसत आहे.  

यावेळी सलमानने ईशारा-ईशारामध्ये खुलासा केला की तो सिंगल नाही आहे. शहनाज गिलसोबत बोलताना सलमानने सांगितलं की, जेव्हा सिंगल होईन तेव्हा खुश होईन. मात्र यापुढे भाईजान ना काही बोलला ना ही आपल्या लेडी लव्हबद्दल काही हिंट दिली. मात्र सलमानचा मिस्ट्री गर्लसोबतचा  हा फोटो जेव्हा समोर आला तेव्हा सलमानच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.

फोटोत जी मुलगी दिसत आहे. ती जरी प्रसिद्ध चेहरा नसली मात्र सलमान तिला खूप चांगला ओळखतो. असं या फोटोवरुन आपल्याला दिसत आहे. या फोटोमध्ये या दोघांची बाँन्डिंग पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.   फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलीचं नाव पायल विजय शेट्टी असं आहे. ही मुलगी सलमानसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये भाईजानने पायलच्या गळ्यात हात घातला असून तिसऱ्या फोटोमध्ये तो तिला किस करताना दिसत आहे. कोलाज शेअर करत पायलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आयी ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे क़रीब है'. पाहा फोटो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता जर हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या मनात काहि भलतं-सलतं सुरु झालं असेल तर थांबा, कारण पायल कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. पायल ही बॉस 15 मध्ये दिसलेल्या विशाल कोटीयनची गर्लफ्रेंड आहे. बिग बॉस संपल्यानंतर पायल आणि विशाल सलमानला भेटले, ज्याचे फोटो दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

पायलच्या या फोटोवर कमेंट करत विशालने लिहिलं आहे की, 'आता मला अजय देवगण व्हावं लागेल'. अजय देवगण आणि सलमानने हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केलं होतं आणि या चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होती. आता तुम्हाला पुढची कहाणी समजलीच असेल.