छायाचित्रकार तेजस नेरुरकरच्या संकल्पनेतील कॅलेंडर 'वंदे मातरम् २०१९'

 त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच...

Updated: Jan 18, 2019, 01:18 PM IST
छायाचित्रकार तेजस नेरुरकरच्या संकल्पनेतील कॅलेंडर 'वंदे मातरम् २०१९' title=

 

मुंबई : छायाचित्रकार तेजस नेरूरकर कायमच आपल्या फोटोंमधून वेगवेगळी संकल्पना मांडत असतो. आता 26 जानेवारीच्या निमित्ताने त्याने 'वंदे मातरम् 2019' ही संकल्पना मांडली आहे. हे सर्व फोटो कॅलेंडरच्या रूपा असणार आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते या  "वंदे मातरम् २०१९" कॅलेंडरचे लाँच करण्यात आले. या देशात आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो ,,स्वतंत्र राहू शकतो ,, या देशाचा प्रत्येक कोपरानकोपरा हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला परत मिळाला आहे.. त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच! पण त्यांची आठवण मनाच्याही  अंतर्मनात कुठल्याना कुठल्याही रूपात पक्की असावी ह्या धारणेतून कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात आली. केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी असे दिवस सोडल्यास त्या हुतात्म्यांची आठवण क्वचितच होते, अथवा होते का ? हा मी स्वत:ला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून, त्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून या वर्षीचे कॅलेंडर "वंदे मातरम् २०१९" या नावाने प्रदर्शित करतोय' .

याप्रसंगी अविनाश गोवारीकर ह्यांनी तेजसच्या या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

"वंदे मातरम्" या गीताने गायिका सायली पंकजने या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कॅलेंडरला सोशल मीडियावर देखील चांगली पसंती मिळत आहे .

अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. 

 

मराठी सिनेसृष्टीतील जवळपास २६ कलाकारांचा सहभाग यंदाच्या या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे. शरद केळकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, प्रवीण तरडे, सुनिल बर्वे,  सागर देशमुख,  डॉ  अमोल कोल्हे, आदिनाथ कोठारे , प्रियदर्शन जाधव , अमेय वाघ , ललित प्रभाकर, अक्षय टांकसाळे, सोनाली कुलकर्णी , प्रिया बापट , श्रिया पिळगावकर , प्राजक्ता माळी , सई ताम्हणकर , नेहा महाजन , प्रियांका बर्वे , पूजा सावंत, उर्मिला कानिटकर, श्रेया बुगडे , ऋता दुर्गुळे , तेजश्री प्रधान , स्पृहा जोशी या सर्व कलाकारांचं  स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेत फोटोशूट केलं आहे. माझ्या छोट्याश्या विनंतीला मान देऊन सर्व जण वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दात तेजसने सर्वांचे आभार मानले.