रेखा यांनी कुशीत घेतलेल्या 'या' मुलीला ओळखलंत का? आज करतीये बॉलिवूडवर राज्य

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत रेखा यांच्या कुशीत एक लहान मुलगी दिसत आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे.  

Updated: Jan 31, 2023, 02:26 PM IST
रेखा यांनी कुशीत घेतलेल्या 'या' मुलीला ओळखलंत का? आज करतीये बॉलिवूडवर राज्य title=
रेखा यांनी कुशीत घेतलेल्या 'या' मुलीला ओळखलंत का?

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत रेखा वेगळ्या अंदाजात दिसत आहे. रेखा यांनी यावेळी कुशीत एका निरागस लहान मुलीला घेतलेलं दिसत आहे. रेखा यांच्यासह दिसणारी ही लहान मुलगी कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? सोशल मीडियावरही (Social Media) अनेकजण ही मुलगी कोण आहे याची चर्चा करत आहे. तुमच्या माहितीसाठी, ही मुलगी आज बॉलिवूडमधील एका आघाडीची अभिनेत्री आहे. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकता का?

जर तुम्हाला या अभिनेत्रीला ओळखणं कठीण जात असेल तर आम्ही तुम्हाला काही हिंट्स देतो. या फोटोत दिसणारी मुलगी आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा असून, आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नाही तर तिचे वडीलही चित्रपसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) यांची हा खास मैत्रीण आहे. आता तर तुमच्याही लक्षात आलं असेल की, ही मुलगी अजून कोणी नाही तर चंकी पांडेची (Chunkey Pandey) मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) आहे. 

अनन्या पांडेनेच हा फोटो रेखा यांच्या वाढदिवशी शेअर केला होता. अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय कार्तिक आर्यनसहित 'पती, पत्नी और वो' तसंच सिद्धार्थ आणि दीपिकासहित 'गहराइयां' चित्रपटात तिने मुख्य भूमिका निभावली होती.

अनन्या पांडेचा शेवटचा चित्रपट 'लायगर' बॉक्स ऑफिसवर आपटला होता. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लायगर' चित्रपटाकडून अनन्या आणि विजयला फार अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट खास कामगिरी करु शकला नाही.