Payal Ghosh on Weight Loss: सेलिब्रेटी हे आपल्या डाएटवरून चांगलेच कॉन्शियस असतात. त्यामुळे त्यांच्या फीटनेसबद्दल कायमच चर्चा होताना दिसतात. रूपेरी पडद्यावर एकदम फीट दिसण्यासाठी त्याचसोबत खूप सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री या प्रयत्नशील असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. कुठेही डाएट किंवा एक्सरसाईज न करता या अभिनेत्रीनं चक्क आपलं वजन 10 किलो कमी केलं आहे. त्यामुळे सध्या याचीच चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या प्रोफाईलकडे पाहिलंत तर आपल्याला कळून येईल की या अभिनेत्री या चांगल्याच फीटनेस फ्रीक असल्याच्या दिसतात. अनेकदा त्या जीमबाहेरच जास्त फिरकताना दिसतात. त्यामुळे त्यांची चर्चा रंगते.
या अभिनेत्रीचे नावं आहे पायल घोष. याबद्दल खुद्द पायल घोषनंच खुलासा केला होता. तिनं किटो डाएट फॉलो केलं होतं. याबद्दल तिनं सांगितलं होतं. या डाएटमध्ये कार्ब असतं. ज्यातून तुम्हाला 75 टक्के कॅलरी फॅट्स, 20 टक्के प्रोटीन आणि 5 टक्के कार्बोहाइड्रेट्स असतात. समोर आलेल्या माहितीनुसार, असे कळते की पायल घोष ही आपल्या आगमी हॉलिवूड चित्रपटासाठी तयारी करते आहे. तिचा हा डेब्यू सिनेमा असेल आणि यामध्ये ती विलनच्या भुमिकेतून दिसणार असल्याचे कळते आहे.
हेही वाचा - VIDEO: बिग बींच्या नातीचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून ऐकणाऱ्यांनी तोंडात घातली बोटं!
यापुर्वीही तिनं आपल्या या वेटलॉसवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊनमध्ये तिनं एक फोटो शेअर केला होता ज्यात तिनं म्हटलं होतं की तिनं 72 किलो वजन कमी केलं होतं आणि त्यातून तिला पॅनिक अटॅकही येत होते. तिनं सांगितलं होतं की औषधं घेऊन तिचं वजन वाढलं होतं. यावेळी तिनं असंही सांगितलं होतं की तेव्हा तर ती एक्सरसाईजही करत नव्हती कारण तिला व्यायामाचीही भिती वाटतं होतं. तिनं आपलं वजन कमी करण्यासाठी ना कुठला योग केला होता, ना बॉक्सिंग ना जिम. या शिवाय तिनं आपलं डाएट सुरूच ठेवलं होतं. तिनं इन्टाग्रामवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं म्हटलं होतं की आठ महिन्यांनी तिचं हे वजन कमी झाले तेही 55 किलो. यावेळी तिनं आपला जूना आणि नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
यावेळी तिनं म्हटलं होतं की, ती लॉकडाऊनचा सदुपयोग करते आहे. यावेळी ती आपला वेळ आपले वजन कमी करण्यावर तरते आहे असं ती म्हणाली होती.