पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये एकत्र, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाले...

सध्या पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये आपल्या सुट्या एकत्र घालवत आहेत.

Updated: Nov 7, 2021, 05:14 PM IST
पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये एकत्र, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाले... title=

मुंबई : इंडियन आयडल 12 फेम पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इंडियन आयडल शो संपला असला तरी अरुणिता आणि पवनदीपचा आवाज ऐकण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एवढंच नाही तर दोघे आता सध्या काय करत आहेत? कोठे आहेत? त्यांच्या प्रत्येक घडामोडी जाणून घेण्याचा त्यांच्या चाहत्यांचा प्रयत्न असतो.

पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये

सध्या पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये आपल्या सुट्या एकत्र घालवत आहेत. दरम्यान त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द पवनदीपने अरुणितासोबत लंडनमध्ये दिवाळी साजरी केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करत पवनदीपने कॅप्शनमध्ये सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. शिवाय सर्वांना सकारात्मक आणी कायम आनंदी राहण्याचं आवाहन केलं आहे.

फोटोमध्ये अरुणिता आणि पवनदीप फार सुंदर दिसत आहेत. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंन्ट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंन्टमध्ये, 'दोघे कायम असेचं सोबत राहा...' असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या चाहत्याने 'तुमची जोडी फारचं सुंदर आहे.' अशी कमेन्ट केली आहे. पवनदीप आणि अरुणिताला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पवनदीप आणि अरुणिता बद्दल सांगायचं झालं तर, पवनदीप इंडियन आयडल 12 विजेता आहे. तर अरुणिता सेकेण्ड रनरअप आहे. शो दरम्यान दोघांमध्ये लव्ह ऍगल दाखवला गेला आहे. आता शो संपल्यानंतर देखील ही जोडी सर्वत्र एकत्रं दिसत आहे. प्रेक्षकांना देखील या दोघांना एकत्र पाहायला आवडत आहे.

परंतु शोदरम्यान पवनदीप आणि अरुणिताने आमच्यात असं काही नाही असे सांगत चर्चांना पुर्णविराम दिलं. ते म्हणाले की आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही सध्या आमच्या करिअरवरती लक्ष केंद्रित करणार आहोत.