आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी वयाच्या 42 व्या वर्षी पदव्युत्तर, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा!

Pawan Kalyan Wife Anna Lezhneva  : पवन कल्याण यांच्या पत्नी यांना नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळताच... 

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2024, 03:07 PM IST
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी वयाच्या 42 व्या वर्षी पदव्युत्तर, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या शुभेच्छा! title=
(Photo Credit : Social Media)

Pawan Kalyan Wife Anna Lezhneva  : अभिनेता आणि आंध्र प्रदेशचं उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पत्नी अ‍ॅना लेझनेव्हाला नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरमधून मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली. याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी पवन कल्याण त्याच्या पत्नीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये सहभागी झाले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अ‍ॅना लेझनेव्हाला डिग्री मिळताना दिसत आहे. त्यावेळी अ‍ॅना लेझनेव्हा यांनी निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत नायडू यांनी कॅप्शन दिले की, सिंगापुर यूनिव्हर्सिटीमधून आर्ट्समध्ये पदव्युत्तर (मास्टर डिग्री) पूर्ण करण्यासाठी अ‍ॅना लेझनेव्हाला खूप खूप शुभेच्छा. तुझी कामगिरी ही उल्लेखनीय आहे आणि सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. विशेषत: आंध्र प्रदेशातील त्या बहिणी आणि मुलींसाठी ज्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण घ्यायचे आहे.'

मॉडेलिंग आणि अभिनय

दरम्यान, रशियाच्या असलेल्या अ‍ॅना लेझनेव्हा यांनी आधी मॉडेल म्हणून काम केलं आहे. त्याशिवाय चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 

कोण आहे अ‍ॅना लेझनेव्हा?

अ‍ॅना लेझनेव्हा आणि पवन कल्याण यांनी 'तीन मार' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात खूप चांगली ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मग मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर त्यांनी या नात्याला नाव देण्याची ठरवले आणि त्यांनी लग्न केलं. पवन कल्याण यांनी 2013 मध्ये अ‍ॅना लेझनेव्हासोबत लग्न केलं. तर त्या दोघांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव मार्क शंकर पवनोविच असं आहे. तर त्यांना एक मुलगी असून तिचं नाव अंजना पवनोवा असं आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे अ‍ॅना लेझनेव्हा या रशियातील असल्या तरी देखील संस्कृती आणि परंपरा खूप आवडतात. 

हेही वाचा : लग्नाच्या 1 महिन्यानंतर झहीर इक्बालचा खुलासा! पळून जाणारच होतो, पण...

अ‍ॅना लेझनेव्हा नेहमीत पारंपारिक साडीत दिसतात. दरम्यान, पवन कल्याण यांच्यासोबत पोलिंग सेंटरवर जाणं आणि जिंकल्यानंतर पवन कल्याण यांच्या कपाळी टिळा लावतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.