Pavitra Rishta 2.0: मानव पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; हा अभिनेता साकारणार भूमिका

मालिकेतील मानवच्या भूमिकेचा शोध पूर्ण...

Updated: Jun 15, 2021, 04:18 PM IST
Pavitra Rishta 2.0: मानव पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; हा अभिनेता साकारणार भूमिका  title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' मालिकेने फार कमी दिवसांत चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेतील मानव आणि अर्चनाच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेत मानवची भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली, तर अर्चनाच्या भूमिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे होती. मानव आणि अर्चनाचं प्रेम फक्त मालिकेपूरता मर्यादित नव्हतं, तर खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्यात प्रेम संबंध होते दोघांचे चाहते देखील त्यांच्या लग्नाच्या प्रतिक्षेत होते.

पण काही कारणांमुळे दोघे विभक्त झाले. आता ज्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला मानव आणि अर्चना भेटले होती. ती मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्ट्सनुसार मालिकेची निर्मिती एकता कपूर करणार असल्याचं समजत आहे. पिंकव्हीलाने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता शाहीर शेख 'पवित्र रिश्ता 2' मालिकेत मानवची भूमिका साकारणार आहे. 

तर महत्त्वाचं म्हणजे सात वर्षांनंतर अंकिता पुन्हा अर्चना म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय मालिकेती इतर कलाकारांची यादी लवकरचं जाहीर करण्यात येणार आहे. याबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण मानव-अर्चनाची नवी जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते का? हे महत्त्वाचं ठरणार आहे. 

'पवित्र रिश्ता' मालिके बद्दल सांगायचं झालं तर, 2009 साली ही मालिका सुरू झाली. प्रेक्षकांनी देखील मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. पण 2012 साली सुशांतने मालिकेतून काढता पाय घेतला आणि बॉलिवूडच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. पण 14 जून रोजी सुशांतने राहत्या घरी गळफास घेत, जगाचा निरोप घेतला.