अरूणिताने खासगी गोष्टी सर्वांसमोर उघड करताचं पवनदीप भडकला

अरुणिताला माहित आहे पवनदीपची ती गोष्ट; सगळ्यांसमोर रिवील करताचं पवनदीप भडकला

Updated: Aug 27, 2021, 08:18 AM IST
अरूणिताने खासगी गोष्टी सर्वांसमोर उघड करताचं पवनदीप भडकला title=

मुंबई : 'इंडियन आयडल 12' शो संपला असला तरी प्रेक्षकांच्या मनात अद्यापही शोची जादू कायम आहे. शोमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेले स्पर्धक म्हणजे पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल. दोघांची केमिस्ट्री सर्वांनाचं आवडली. दोघांच्या लव्ह एन्गलची चर्चा देखील तुफान रंगली. पण आमच्यामध्ये लव्ह एन्गलनसून आम्ही चांगले मित्र आहोत... असा खुलासा दोघांनी केला. पण एका कर्यक्रमात असं काय घडलं की पवनदीप आणि अरूणिताचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं. 

अरूणिता पवनदीपला 'शॉर्ट टेम्पर्ड' म्हणाली. त्यामुळे पवनदीप नाराज झाला. हा किस्सा आहे एका म्यूझिकल सीरिजच्या टीझरचा. यावेळी अरूणिता आणि पवनदीपसोबत शनमुखप्रिया देखील होती. टीझर लाँचदरम्यान जेव्हा तिघांमध्ये शॉर्ट टेम्पर्ड कोण आहे? असा प्रश्न विचारताचं अरूणिताने पवनदीपकडे इशारा केला. 
 

अरूणिताच्याया कृतीनंतर पवनदीप रागात म्हणाला 'तुला कसं माहिती?' त्यानंतर अरूणिता यावर स्पष्टीकरण देत राहीली. तर दुसरीकडे असं कळत आहे की पवनदीपला या गोष्टीचा वाईट वाटलं. सध्या त्यांच्या हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.