समोर पुस्तक आणि मौनीचा बिकनी लूक, चाहते म्हणाले, पुस्तक वाचतेय की...

अलीकडेच, तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर आग लावत आहेत. 

Updated: Aug 27, 2021, 08:20 AM IST
समोर पुस्तक आणि मौनीचा बिकनी लूक, चाहते म्हणाले, पुस्तक वाचतेय की... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.  दररोज ती बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच, तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर आग लावत आहेत. फोटोंमध्ये मौनी रॉय बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती करत असल्याचं दिसत आहे. तिचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे.

फोटोंमध्ये मौनी रॉय सुंदर हिरव्या पार्श्वभूमीच्या ठिकाणी वाळूवर बिकिनी परिधान करत समुद्रकिनाऱ्यावर झोपल्याचं दिसत आहे. वाळूवर दुपट्टा पसरत ती एक पुस्तक वाचत आहे. हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'बाहेर खूप गरम होते आणि मी आत बसून एक गाणे ऐकत होतो, किंवा कदाचित ती एक कविता होती.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीने लिहिले, 'अम्म .. मला आठवत नाही. मला थोडं आठवतंय. ' जरी अभिनेत्रीने दिलेल्या कॅप्शनचा या  फोटोंसोबत काहीही संबंध नसला, तरी यामुळे चाहत्यांना फारसा फरक पडत नाही. चाहत्यांनी कमेंटमध्ये  त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या या सुंदर फोटोंची प्रशंसा केली आहे.