अर्जुनसोबत असलेल्या नात्याविषयी परिणीती म्हणते...

माझ्या फोनमध्ये जास्त फोटो अर्जुनचे असतात...

Updated: May 3, 2019, 12:57 PM IST
अर्जुनसोबत असलेल्या नात्याविषयी परिणीती म्हणते... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये चांगला, खरा मित्र भेटणं फार कठीण आहे परंतु अभिनेता अर्जुन कपूरच्या रुपात मला खरा मित्र भेटला असल्याचं तिने म्हटलं आहे. एक टॉक शो 'फीट अप विथ द स्टार्स सीजन २' मधील एका भागात परिणीतीने अर्जुन आणि तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने चर्चा केली आहे. 

या शोदरम्यान परिणीतीला तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबाबत विचारलं असता परिणीतीने 'आमच्यामध्ये मैत्री, प्रेम आणि राग असं नातं आहे. बॉलिवूडमध्ये एक खरा मित्र भेटणं कठीण आहे आणि अर्जुन माझा चांगला, खरा मित्र असल्याचं' तिनं म्हटलंय. त्याच्यासोबत ऑफस्क्रिन केसिस्ट्रीही तितकीच मजेशीर असल्याचं तिने म्हटलंय. मला माझे फोटो काढण्यासाठी माझा फोन त्याला देण्यात काहीच संकोच वाटत नाही. जेव्हा मी फोनची गॅलरी बघते, फोनमधले फोटो बघते त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त फोटो अर्जुनचे असतात. माझ्या फोनमध्ये ५० हून अधिक सेल्फी अर्जुनचेच असल्याचं परिणीतीने म्हटलंय.

फिल्म को लेकर परिणीति चोपड़ा और अर्जुन कपूर की दोस्ती में आई दरार!

'इश्कजादे' आणि 'नमस्ते लंडन' या चित्रपटातून एकत्र काम केल्यानंतर परिणीती आणि अर्जुन चांगले मित्र झाले. पुन्हा एकदा दोघे एकत्र 'संदीप और पिंकी फरार' मध्येही स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या शोगदरम्यान परिणीतीला अर्जुन आणि मलाइया यांच्या लग्नाविषयी असणाऱ्या अफवाहांबाबत विचारण्यात आलं त्यावेळी परिणीतीने 'दोघाही लग्न करणार की नाही याबाबत माहित नसल्याचं' सांगितलं.

अर्जुन कपूर ने माना कि मलाइका अरोड़ा हैं 'खास', शादी की खबर पर ऐसा दिया रिएक्शन!

परिणीती अमेरिकी चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. तसंच 'जबरिया जोडी' आणि 'सायना नेहवाल बायोपिक' मधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.